Badlapur Chemical Company Blast | केमिकल कंपनीतील स्फोटाने बदलापूर हादरले; एका कामगाराचा मृत्यु, चार कामगार जखमी

बदलापूर : येथील खरवई परिसरातील एमआयडीसीमधील (Kharwai MIDC) एका केमिकल कंपनीत एका पाठोपाठ अशा ५ स्फोटाने (Badlapur Chemical Company Blast) संपूर्ण बदलापूर व परिसर पहाटे हादरुन गेला. कंपनीला लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यु झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

बदलापूरमधील खरवई एमआयडीमध्ये वी के केमिकल ही कंपनीत (VK Chemical Company) आहे. या ठिकाणी रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जाते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच स्फोट झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की त्याचा आवाज ४ ते ५ किलोमीटर परिसरात ऐकायला गेले. संपूर्ण बदलापूर शहर हादरले. या घटनेची माहिती समजताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यांनी आगीवर नियंत्रण आणून कंपनीतील जखमी कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यातील एका कामगाराचा मृत्यु झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | रेंजहिल्स रस्त्यावर अशोकनगर भागात तीन दुकानांना आग

Kondhwa Khadi Machine Chowk | पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील कोंढवा खडी मशीन ते मंतरवाडी दरम्यानच्या रस्त्याची रुंदीची माहीती घेउन योग्य ते बदल करण्याचे प्रयत्न करण्यात येतील – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पिंपरी : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू