ICC World Cup 2019 : विजय शंकर ‘OUT’, ‘या’ खेळाडूला संधी मिळणार !

लंडन : वृत्‍तसंस्था – भारतीय टीमचा ओपनर शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर विजय शंकरला चांगली संधी मिळाली होती. मात्र, सामन्यादरम्यान जखमी झालेल्या विजय शंकरला देखील वर्ल्डकप मधून बाहेर पडावे लागले आहे. विजय शंकरच्या जागी आता मयांक अग्रवाल याला संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय शंकरच्या जागेवर मयांक अग्रवाल किंवा श्रेयस अय्यर यांना संधी मिळू शकते.

वर्ल्डकप मधील दोनच सामने खेळण्यानंतर शिखर धवनला दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडाव लागलं होतं. त्यानंतर टीम इंडियाला भुवनेश्‍वरच्या स्वरूपात दुसरा झटका बसला. भुवनेश्‍वर देखील दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले. त्यानंतर आज टीम इंडियाला तिसरा धक्‍का बसला आहे. विजय शंकर दुखापतीमुळे वर्ल्डकप मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मयांक अग्रवाल यालाच संधी देण्यात येईल असे सुत्रांनी सांगितले असले तरी श्रेयस अय्यरच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो असे काही जणांचे म्हणणे आहे.

 

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली