MC Stan | पुन्हा एकदा एमसी स्टॅनचे कॉन्सर्ट रद्द; कॉन्सर्टदरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

पोलीसनामा ऑनलाइन : बिग बॉस 16 च्या विजेतेपदानंतर रॅपर एमसी स्टॅनला (MC Stan) खूपच प्रसिद्धी मिळाली. आज सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक चाहते आहेत. बिग बॉस 16 चे विजेतेपद मिळाल्यानंतर एमसी स्टॅनने (MC Stan) संपूर्ण देशभरात त्याच्या कॉन्सर्टची घोषणा केली होती. त्याच्या प्रत्येक कॉन्सर्टला चाहत्यांची मोठी गर्दी देखील होताना दिसत आहे. नुकताच इंदोर मध्ये 17 मार्चला झालेल्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. या कॉन्सर्ट दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
PUBLIC STANDS WITH MC STAN@comindore @IndoreCollector @CMMadhyaPradesh #MCStan #BajrangDal pic.twitter.com/x4BNd7lr4A
— S I G M A x M AN (@krishnakeshav_) March 18, 2023
यावेळी बजरंग दलाने एमसी स्टॅनच्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. एमसी स्टॅन हा त्याच्या गाण्यातून शिवीगाळ आणि महिलांवर करत असलेल्या वक्तव्याच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर स्टॅन त्याच्या गाण्यांमधून ड्रग्जसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत देशातील तरुण पिढीला वाईट मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे देखील सांगितले जात आहे. सोशल मीडियावर या दरम्यानचे काही व्हिडिओज मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की बजरंग दलाचे कार्यकर्ते स्टॅनच्या (MC Stan) कॉन्सर्ट दरम्यान स्टेजवर जाऊन गोंधळ घालताना दिसत आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या गोंधळामुळे कॉन्सर्ट रद्द झाल्यानंतर आता एमसी स्टॅनच्या चाहत्याकडून सोशल मीडियावर ‘स्टँड विथ एमसी स्टॅन’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तर या संपूर्ण प्रकरणानंतर चाहते मात्र त्याला पाठिंबा देत आहेत.
Those who are asking about "ki MCStan safe hai ya nhi"
yes stan was safe and he is in tight sequrity.PUBLIC STANDS WITH MC STAN pic.twitter.com/z7rmnHylJZ
— 🐼𝒟𝑜𝓇𝒶𝑒𝓂𝑜𝓃💞🦋 (@Dora_edits) March 17, 2023
व्हिडिओ शेअर करत अनेकांनी एमसी स्टॅनला पाठिंबा दिला आहे. तर बजरंग दलाविरोधात चाहते वक्तव्य
करताना दिसत आहेत. यापूर्वी देखील स्टॅनच्या कॉन्सर्ट मध्ये गर्दीतून पाणी बाटली फेकून त्याला मारण्याचा
प्रयत्न करण्यात आला होता1. यावेळी देखील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला होता.
तर आता येणाऱ्या 18 मार्चला नागपूर मध्ये आणि 19 मार्चला पुण्यात एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट होणार आहे.
Web Title :- MC Stan | bajrang dal cancelled bigg boss 16 winner mc stan concert in indore video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीचा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल
Chandrashekhar Bawankule | शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं