MC Stan | ‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅनने ‘त्या’ बाबतीत विराट कोहलीला टाकले मागे; सोशल मीडियावर एकच धुमाकूळ
पोलीसनामा ऑनलाइन टीम : MC Stan | छोट्या पडद्यावर प्रसिद्ध शो म्हणजे ‘बिग बॉस’. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 16’ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. यावेळी एमसी स्टॅनने (MC Stan) विजेतेपद मिळवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. यंदाच्या सिझनचा विजेता शिव ठाकरे असेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र एमसी स्टॅनने यंदाच्या पर्वावर बाजी मारली. एमसी स्टॅन जिंकल्यानंतर अनेकांनी त्याच्या पॉप्युलरिटीवर प्रश्न उपस्थित केला. एमसी स्टॅनने केलेल्या एका पोस्ट वरून त्याची फॅन फॉलोइंग विराट कोहली पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
विराट कोहली हा भारतातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्याची तुलना आता एमसी स्टॅन सोबत केली जात आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. विजेतेपद पटकावल्यानंतर सलमान खान आणि बिग बॉस ट्रॉफी सोबत स्टॅनने एक फोटो पोस्ट केला होता. त्याच्या या फोटोवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव दिसून आला. काही तासातच या फोटोवर रेकॉर्ड ब्रेक लाईक्स पाहायला मिळाले. तर याच दरम्यान विराट कोहलीने देखील एक फोटो शेअर केला होता. तर विराटच्या या फोटोवर 20 लाखाजवळ लाईक्स मिळाले, तर एमसी स्टॅनच्या फोटोला 60 लाखांवर लाईक्स मिळाले होते. यावरून विराट पेक्षा एमसी स्टॅनचे (MC Stan) फॉलोवर अधिक असल्याचे समजले जात आहे. स्टॅनचे इंस्टाग्राम वर 70 लाख फॉलोवर्स आहेत.
स्टॅनची फॅन फॉलोवर्स पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच एमसी स्टॅन म्हणाला की,”बाहेर कोण काय बोलतो याचा मला काहीच फरक पडत नाही.
प्रत्येकाने एक गोष्ट स्वीकारायला हवी, जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही किंवा मिळत नसेल तर याचा अर्थ ती गोष्ट आपल्यासाठी नाही हे समजून घ्यायला पाहिजे.
माझ्या बिग बॉस मधील विजयाने इतर लोक ज्याप्रमाणे हैराण आहेत त्याप्रमाणे मी देखील आहे.
पण ही ट्रॉफी जिंकण्याच्या मी लायकीचा होतो असे मान्यही करतो.”
असेही तो म्हणाला. आतापर्यंत बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने
ट्रॉफी सोबत फोटो शेअर केल्यानंतर त्याला 1 मिलियन हून अधिक लाईक्स मिळाले होते.
तर बिग बॉसची विजेती तेजस्विनी प्रकाशनेही ट्रॉफी सोबत फोटो शेअर केल्यानंतर
तिला 1.3 मिलियन लाईक्स मिळाले होते.
Web Title :- MC Stan | bigg boss 16 winner mc stan insta post has more likes than virat
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
DGP Rajnish Seth | गुन्ह्यातील शिक्षा दर वाढविण्यासाठी प्रयत्न – पोलीस महासंचालक रजनिश सेठ