DGP Rajnish Seth | गुन्ह्यातील शिक्षा दर वाढविण्यासाठी प्रयत्न – पोलीस महासंचालक रजनिश सेठ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व घटक प्रमुख प्रयत्नशील असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ (DGP Rajnish Seth) यांनी सांगितले. तसेच शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी शासनाने काढलेल्या 14 शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे रजनिश सेठ (DGP Rajnish Seth) यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक (Best Investigation Medal) प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

 

गुन्ह्याचा तपासात उत्कृष्ट प्राविण्य दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) यांच्याकडून सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक दिले जाते. राज्यातील 2018 ते 2021 या कालावधी मधील सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक रजनिश सेठ (DGP Rajnish Seth) यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

 

पुरस्कारपात्र पोलीस अधिकारी यांनी खून (Murder), दरोडा (Robbery), जबरी चोरी, राष्ट्रीय सुरक्षेशी (National Security) संबंधित गुन्हे, पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हे, मतिमंद व मुक बधिर मुलींचे लैगिंक शोषण यासारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने आधुनिक तपास पद्धतीचा अवलंब करुन उघडकीस आणले आहेत.

या कार्यक्रमाला सीआयडीचे (CID) अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे (Prashant Burde),
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Pimpri Chinchwad CP Vinay Kumar Choubey),
अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद (Sunil Ramanand), विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश कुमार मेकला (Suresh Kumar Mekala),
विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ (Sudhir Hiremath) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

पत्रकार हत्याप्रकरणी तपासासाठी SIT ची स्थापना
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणात एसआयटीची स्थापना केली आहे.
याप्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.
रत्नागिरी पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून त्यात गुन्हेगारांना नक्कीच शिक्षा होईल, असे रजनिश सेठ यांनी सांगितले.

 

Web Title :- DGP Rajnish Seth | Efforts to increase conviction rate in crime – Director General of Police Rajnish Seth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या शेवाळे टोळीच्या प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या