MCA Election | आशिष शेलार MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MCA Election | भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे बीसीसीआय (BCCI) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आशिष शेलार यांनी खजिनदार पदासाठी अर्ज भरला असल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी सांगतिले आहे. मागील काही दिवस शेलार यांचं नाव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी चर्चेत होते. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत संयुक्त पॅनलही उतरवलं होतं. पण आता बीसीसीआय (BCCI) खजिनदार झाल्यास MCA अध्यक्ष म्हणून दुसऱ्या कोणाची तरी वर्णी लागण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक होणार आहे. (MCA Election)

MCA अध्यक्ष कोण?

शरद पवार (Sharad Pawar) आणि आशिष शेलार यांचे पॅनल एकत्रितपणे मैदानात उतरल्याने शेलार हेच एमसीए अध्यक्ष होतील, अशी सगळीकडे चर्चा होती. पण आता ते बीसीसीआय खजिनदार होण्याची शक्यता असल्याने एमसीए अध्यक्ष कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार- आशिष शेलार पॅनलने यादरम्यान दोन डमी अर्ज भरले होते, त्यातीलच एकजण अध्यक्ष होऊ शकतो. यामध्ये उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले अमोल काळे (Amol Kale) आणि सचिवपदासाठी अर्ज भरलेले अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. (MCA Election)

बीसीसीआय अध्यक्ष पदासाठी रॉजर बिन्नीच्या नावाची चर्चा

बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) कार्यकाळ संपत आल्याने आता नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
भारताचा माजी क्रिकेटर आणि 1983 विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी (Roger Binney) पुढील बीसीसीआय अध्यक्ष होऊ शकतो.
18 ऑक्टोबर रोजी सौरव गांगुली यांचा कार्यकाळ संपणार आहे.
त्यामुळे सौरव गांगुलीला या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत रॉजर बिन्नी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

Web Title :- MCA Election | ashish shelar tipped to become bcci treasurer says rajiv shukla likely to withdraw from mca presidential electionuy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा