‘मीडिया बॅन’चा अभिनेत्री कंगनाला मोठा ‘झटका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौत पत्रकारासोबत झालेल्या वादामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या कंगना तिच्या जजमेंटल है क्या या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल जजमेंटल है क्या या सिनेमाचा एक इव्हेंट रात्री मुंबईत होणार होता. या इव्हेंटसाठी कंगना आणि या सिनेमाची निर्माती एकता कपूर दोघीही उपस्थित राहणार होत्या. मीडियालाही या इव्हेंसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पंरतु मीडियाने कंगनाला बॅन केले असल्याने मीडिया हाऊसने या इव्हेंटला कव्हर केले नाही. त्यामुळे मीडिया या इव्हेंटला न आल्याने कंगना आजारी असल्याचे सांगत हा इव्हेंट रद्द करण्यात आला.

कंगानाच्या वकिलाने प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि एंटरटेंमेंट जर्नलिस्ट गिल्डवर निशाणा साधला आहे. त्यांचा अंदाज आहे की, गिल्ड ही एक बेकायदेशीर आणि नोंदणी नसलेली संस्था आहे. वकिलाने या संबंधित दोन्ही संस्थांना म्हटले आहे की, ते एखादं कोर्ट नाही की, ज्याच्याकडे माझी क्लायंट कंगनाविरोधात कायदेशीर फर्मान काढण्याचा अधिकार आहे.”

सूत्रांचं म्हणणं आहे की, कंगनासाठी हा एक मोठा इव्हेंट होता. कंगनाला खरा झटका तेव्हा लागला जेव्हा इव्हेंटमध्ये फोटोग्राफर्सही आले नाहीत. तिला असं सुचवण्यात आलं की, जर इव्हेंट कव्हर करण्यासाठी कोणी येत नसेल तर इव्हेंट कॅन्सल करायला हवा.

नुकतीच कंगानाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी ती एकटीच या शोमध्ये दिसून आली. तिच्यासोबत जजमेंटल है क्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेला राजकुमार राव तसेच सिनेमाची निर्माती एकता कपूरही दिसली नाही.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

Loading...
You might also like