डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा – फुफ्फुसात इंजेक्शन दिल्यानंतर बरा होणार ‘कोरोना’, जाणून घ्या काय आहे सत्य ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेकदा आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यांबाबत चर्चेत असतात. कोरोना व्हायरसच्या उपचारात मलेरिया औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन उपयुक्त असल्याचे वर्णन करणारे ट्रम्प यांनी यावेळी कोरोना-संक्रमित व्यक्तीचे जीवन कसे वाचवायचे यासाठी एक नवीन सिद्धांत आणला आहे. ट्रम्प म्हणतात की, कोरोना (कोविड -१९) च्या संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या फुफ्फुसांना सर्वात जास्त नुकसान पोहोचते, अश्या परिस्थिती एका इंजेक्शन देऊन ते स्वच्छ केल्यास याचा उपचार केला जाऊ शकतो.

गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, वेगवेगळ्या तापमान, वातावरणात आणि पृष्ठभागांवर कोरोना विषाणूचे वर्तन कसे बदलत आहे. संभाषण दरम्यान ट्रम्प यांनी अचानक दावा केला- ‘…. मी पाहिले की फुफ्फुसातील संसर्ग झालेला भाग कश्या प्रकारे स्वच्छ केला गेला. आपण फुफ्फुसांच्या आत इंजेक्शन देऊन असे काहीतरी करू शकतो जेणेकरून आतील संसर्ग साफ होईल. कारण हा विषाणू फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम करतो आणि यामुळे सर्वाधिक मृत्यू होतो. आपण याबद्दल शोधले पाहिजे, त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, परंतु ही कल्पना खूप चांगली दिसते.

ट्रम्प बोलतच राहिले, तज्ञ मात्र शांत …
ट्रम्प कोरोना संसर्ग ठीक करण्यासाठी सिद्धांत देत असताना त्यावेळी व्हाईट हाऊस कोरोना टास्क फोर्सचे समन्वयक देबोराह ब्रिक्स तेथे उपस्थित होते, परंतु त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडण्यास सुरूवात झाली. बर्‍याच लोकांनी म्हटले की हे असेच सुरू राहिल्यास ट्रम्प हे काही दिवसांत अल्ट्रा व्हायलेट किरणांनी कोरोना विषाणू जाळून टाकतील.

डॉक्टरांनी हा दाव्याला म्हंटले वेडेपणा
माहितीनुसार ट्रम्प यांच्या या दाव्यास बर्‍याच डॉक्टरांनी नकार दिला आहे. फुफ्फुसांचा उपचार किंवा अल्ट्रा व्हायलेट किरणांसह उपचार करणे म्हणजे वेडेपणा असल्याचे म्हंटले आहे. डॉक्टरांव्यतिरिक्त कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट राईख यांनी म्हटले की- ‘ ट्रंप जी चुकीची माहिती सांगत आहे, ते सामान्य लोकांच्या जीवनासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. असा प्रचार नाकारला पाहिजे. फक्त डॉक्टर आणि तज्ञांचे ऐका आणि फुफ्फुसे साफ करण्यासाठी कृपया काहीही करू नाही. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर लोकांनी ट्विटरवरुन त्यांच्यावर टीका केली आहे, लोकांनी म्हंटले कि, ट्रम्पच्या अशा विधानांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास कोण जबाबदार असेल.