मृत्यूची अफवा पसरल्यानंतर मीनाक्षी शेषाद्रीने शेयर केले छायाचित्र, आता दिसते अशी

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री चित्रपट जगतातील मोठा चेहरा आहे. आपल्या छोट्या करियरमध्ये तिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर लोकांचे मन जिंकले होते.

मीनाक्षी मोठ्या कालावधीपासून लाईमलाईटपासून दूर राहिली आहे. अलिकडे अचानक तिच्या मृत्यूची अफवा पसरू लागली, ज्यामुळे तिचे चाहते आणि हितचिंतक घाबरले. मात्र, जेव्हा मीनाक्षीला याबाबत समजले तेव्हा तिने स्वत: ही अफवा चुकीची असल्याचे सिद्ध केले.

मीनाक्षीने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेयर केला ज्यामध्ये ती योग करण्याच्या मुद्रेत बसलेली दिसत आहे. हे स्पष्ट आहे की, तिच्या वयाचा परिणाम तिच्या चेहर्‍यावर दिसत आहे. परंतु तिचा फिटनेस तिचे वय चुकीचे ठरवत आहे. मीनाक्षीने फोटो शेयर करत लिहिले- डान्स पोझ. मात्र, यावर संशय आहे की, हा तिचा ऑफिशियल आयडी आहे किंवा नाही, कारण यावर ब्लू टिक मार्क नाही.

मीनाक्षी शेषाद्रीने अभिनय सोडून अनेक वर्षे झाली आहेत. ती आपल्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे आणि मोठ्या कालावधीपासून लाईमलाईटपासून दूर आहे. ती आपला पती आणि मुलांसह अमेरिकेत राहते.

 

 

 

 

मीनाक्षीला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले असले तरी आता ती पहिल्यासारखी अजिबात दिसत नाही. पण 57 वर्षाच्या वयात तिने आपला फिटनेस कौतूकास्पद ठेवला आहे.

 

 

 

मीनाक्षी शेषाद्रीने 1983 मध्ये पेंटर बाबू चित्रपटातून आपल्या करियरला सुरूवात केली होती. पण तिला खरी ओळख मिळाली ती 1983 मध्ये रिलिज झालेल्या हीरो चित्रपटातून. यात ती जॅकी श्रॉफ सोबत रोमान्स करताना दिसली होती. मीनाक्षीने आपल्या करियरमध्ये लव मॅरेज, हीरो, मेरी जंग, आवारा बाप, लवर बॉय, अल्लाह रख्खा, दिलवाला, सत्यमेव जयते, मुकद्दर का फैसला, बीस साल बाद, तूफान, घायल, दामिनी आणि घातक सारख्या चित्रपटांतून काम केले.