Meera Borwankar On Mumbai Police | ‘पोलीस अधिकारी एन्काऊंटरच्या नावाखाली गुन्हेगारांना ठार करत, महिन्याला कोटींची कमाई…’, मीरा बोरवणकरांचा धक्कादायक खुलासा

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Meera Borwankar On Mumbai Police | मुंबई पोलीस दलामध्ये असे काही अधिकारी होते जे एन्काऊंटरच्या नावाखाली थंड डोक्याने गुन्हेगारांना ठार करत, असे करण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला जात असे, असा धक्कादायक खुलासा माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांना मुंबईत जाँईंट सीपी क्राइम या पदावर नियुक्त करण्यात आलं. त्यांच्यावर एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांना नियंत्रणात आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितलं. (Meera Borwankar On Mumbai Police)

एन्काऊंटर नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी

ADV

मीरा बोरवणकर म्हणाल्या, मला जेव्हा क्राईमचं जाँईंट सीपी पद देण्यात आलं तेव्हा मला सांगण्यात आलं होत एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून जे अधिकारी काम करत आहेत त्यांच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. काही अधिकारी त्यावेळी दबाव, राजकीय दबाव यांच्या खाली थंड डोक्याने एन्काऊंटर करु लागले होते. मी जेव्हा ते पद स्वीकारलं तेव्हाच्या एक दोन घटना सोडल्या जसे की हसीना पारकर, विकी मल्होत्रा ही प्रकरणं सोडली तर मला बराच पाठिंबा मिळाला. (Meera Borwankar On Mumbai Police)

अधिकारी माझ्याशी जास्त बोलायचे नाहीत

एन्काऊंटर स्पेशालिस्ट यांना काहीसं अवघडलेपण होतं. कारण मी पैसे घेत नव्हते. तसेच मी महिला आहे त्यामुळे माझ्याशी सगळं कसं काय बोलायचं हा त्यांना प्रश्न पडत होता. एक मात्र मला ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट सांगत असत की तुम्ही 2004-05 मध्ये जे प्रकरण हाती घेत आहात त्याचा निकाल 2014-15 पर्यंत लागणार नाही. त्या दरम्याने आरोपी जामिनावर बाहेर आणि शूट आऊट करणार हे तुम्हाला चालेल का? आपल्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेची अगतिकता मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली, असेही बोरवणकर यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांचा मुद्दा पटत होता

एन्काऊंटर करणारे अधिकारी मला सांगायचे की जर आम्ही त्यांचा एन्काऊंटर केला नाही तर ते गुन्हेगारांना इतर काही लोकांना ठार मारतील. त्यांचा मुद्दा पटत होता. त्यामुळे मी त्यांना पूर्ण नियंत्रणात ठेऊ शकले नाही. परंतु 90-95 टक्के अधिकारी माझ्या बाजूने होते. मला एन्काऊंटर शॉर्टकट पसंत नव्हता, असेही बोरवणकर यांनी सांगितलं.

पैसा कमवणं माझं ध्येय नव्हतं

मीरा बोरवणकर पुढे म्हणाल्या, मला त्यावेळी दोन महत्त्वाचे अधिकारी सांगायचे मीरा, तू तुझं महिन्याला एक
कोटींचं नुकसान करुन घेत आहेत. पण मला काही फरक पडला नाही. कारण पैसा कमवणं हे माझं ध्यय नव्हतं,
असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation- Latur Farmer Suicide | मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र थांबेना, संयम सुटला, आणखी एकाने जीवन संपवलं

Pune Crime News | डेटींग अ‍ॅपवर मैत्री, हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेलेल्या युवकाला…; पुण्यातील नऱ्हे परिसरातील धक्कादायक घटना

Kanhaiya Kumar On Amruta Devendra Fadnavis Songs | कन्हैया कुमार यांनी उडवली उपमुख्यमंत्र्यांची खिल्ली, देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे…

Housing Society Conveyance Deed | पुण्यातील १० हजार हौसिंग सोसायट्यांनी ‘कन्व्हेयन्स डीड’ केलेच नाही, जाऊ शकतो मालकीहक्क

Maratha Reservation- Latur Farmer Suicide | मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र थांबेना, संयम सुटला, आणखी एकाने जीवन संपवलं