Meera Borwankar | ‘नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकरांविरोधात सबळ पुरावे होते, पण…’, ‘तो’ प्रसंग सांगताना मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौप्यस्फोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते पॉवरफुल झाले आहेत आणि आम्ही पोलीस प्रशासक (Police Administrator), बदल्या आणि पोस्टींगसाठी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहिलो आहोत. हे समजासाठी चांगले नाही. असे सांगत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी पुणे हिंसाचारावेळी (Pune Violence) घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) व मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा नावाचा उल्लेख करत आणखी एक गौप्यस्फोट केला.

मीरा बोरवणकर म्हणाल्या, ज्यावेळी नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा होता. त्यावेळी आमच्याकडे टेक्निकल पुरावा होता. पुणे बंदमध्ये हिंसाचार कसा करावा याबाबत चांगला पुरवा होता. माझे अधिकारीच मला तेव्हा म्हणाले, मॅडम गुन्हा दाखल करु नका. आम्हाला तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) झालेले पाहायचे आहे. त्यामुळे त्यावेळी मी खूप दबावाखाली होते. आपण जर असं केले तर आपल्याला पोलीस आयुक्त पद देण्यात येणार नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

विरोधाची मला किंमत चुकवावी लागली

अजित पवार (Ajit Pawar) यांना मीडिया व्हिलन करतेय, पण मी जे घडलंय ते पुस्तकात लिहिलंय.
व्हिलन तेव्हा होतो जेव्हा शासकीय जमीन आपण देऊन टाकली असती. पुणे पोलिसांना (Pune Police) हा प्रस्ताव मान्य नाही असं आपण जेव्हा शासनाच्या निदर्शनाला आणले. आम्ही जागा देणार नाही असे सांगितल्यानंतर शासनाने आदेश मागे घेतला. माझ्या विरोधाची मला किंमत चुकवावी लागली. पण वाईट वाटलं नाही कारण मी घेतलेला निर्णय योग्य होता. मला निवृत्त होऊन सहा वर्षे झालीत, कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, असं मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी सांगितले.

राजकीय पक्षाला रोखठोक अधिकारी आवडत नाही

पुस्तकाबाबत बोलताना मीरा बोरवणकर म्हणाल्या, मी पुस्तक वर्षभरापूर्वीच लिहिलंय, प्रकाशन उशीरा झाले.
त्यामुळे टायमिंगबाबत आरोप चुकीचा आहे असंही मीरा बोरवणकर यांनी स्पष्ट केले.
तसेच कुठल्याही राजकीय पक्षाला एकदम रोखठोक अधिकारी आवडत नाही.
आपण कुठल्याही एका पक्षाला जबाबदार धरु शकत नाही. जे अधिकारी त्यांचे सांगणे ऐकतात असेच अधिकारी
नेत्यांना आवडत असतात, असं बोरवणकर यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | दिवे घाटात वाहन चालकाला लुटणाऱ्या निलेश बनसुडे व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 69 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Rahul Narvekar On Sanjay Raut | राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर, ”संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का, त्यांच्यावर बोलून महत्त्व का द्या?”