तापसी पन्नू आणि भूमि पेडनेकरचा जबरदस्त ‘मोशन पोस्टर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेत्री भूमि पेडनेकर या दोघीही बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे आहे. या दोघींचा आगामी चित्रपट ‘सांड की आंख’ चा मजेदार पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या पोस्टरमध्ये पुन्हा एकदा दोघांचा जबरदस्त लुक सगळ्यांच्या समोर आला आहे.

चित्रपट ‘सांड की आंख’ बॉक्स ऑफिसवर येण्यासाठी तयार आहे. चित्रपट मेकर्सने याचा मोशन पोस्टर तयार करुन येणाऱ्या टीजरची माहिती दिली आहे. या काही सेंकेदचा मोशन पोस्टर खूपच जबरदस्त आहे. या पोस्टरला पाहून तुम्हाला ही या बहिणींची कथा पाहण्याची उत्सुकता वाढेल.

या पोस्टरची सुरुवात तोमर बहिणींच्या मेडलच्या रांगेने होते. यांनतर समोर येतो तापसी आणि भूमिचा जबरदस्त लुक. यामध्ये दोघेही आपले-आपले सर्टिफिकेट हातात घेऊन विजयाचे उत्सव साजरा करत असल्याचे दिसते.

अनुराग कश्यपचा चित्रपट ‘सांड की आंख’ मध्ये तापसी पन्नू आणि भूमि पेडनेकरसोबत ‘मुक्काबाज’ फेम विनीत सिंह पण दिसून येणार आहे. सध्यातरी विनितच्या भूमिकेचा खुलासा झाला नाही पण ही गोष्ट खरी आहे की, विनित चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच प्रकाश झा पण महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

तापसी आणि भूमि चित्रपट ‘सांड की आंख’ मध्ये निशानेबाजच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमरच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचे प्रोड्यूसर अनुराग कश्यप आणि निधी परमार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर तुषार हीरानंदानी आहे. पहिल्यांदाच तापसी आणि भूमि एकत्र दिसणार आहे. चित्रपट जी म्यूजिक बॅनरवर बनला आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय