पुण्याच्या क्राईम ब्रँचमध्ये मोठे फेरबदल !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) पुर्नरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुन्हे शाखेतील पाच पथके बरखास्त होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेमध्ये युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५ तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक, होमिसाईड पथक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा विभाग, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाची दोन पथके (गुंडा स्क्वाड), वाहन चोरी विरोधी पथक अशी तेरा पथके आहेत. गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी या साठी आयुक्तांनी गुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सुरु केल्या होत्या. आज पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी गुन्हे शाखेच्या पुर्नरचनेचा प्रस्ताव मांडला.

या बैठकीत गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक पथक, होमिसाईड पथक, प्रॉपर्टी सेल, वाहन चोरी विरोधी पथक, संघटित गुन्हेगारी विरोधी पथक बरखास्त करण्याचा करुन पुर्नरचना करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी मांडला. दरम्यान, गुन्हे शाखेतील महत्वाची पाच पथके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त पुणे पोलीस दलात पसरल्याने खळबळ उडाली आहे. बरखास्त करण्यात आलेल्या पथकातील पोलिसांना सध्या अस्तिवात असलेल्या युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५,  खंडणी विरोधी पथकात सामावून घेतले जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. \

गुन्हे शाखेचे अतिरीक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल करण्यात आहेत. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी संपूर्ण गुन्हे शाखेची पुर्नरचना करण्याचा निर्णय घेतला आहे.