मेरी ख्रिसमस काल आणि आज 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगभर ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांचा हा प्रमुख सण मानला जातो. भारतात देखील हा सण अपूर्व आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांचे आराध्य दैवत प्रभू येशूचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला होता. त्याच्या जन्माचा उत्सव म्हणून जगभर नाताळ सण साजरा केला जातो. काही ठिकाणी नाताळ ६,७ आणि १९ जानेवारीला साजरा केला जातो.

खरंतर ख्रिस्ती बांधवांचा हा सण पण महाराष्ट्राचा विचार करता केवळ ख्रिस्ती बांधवच नाही तर इतर धर्मीय देखील नाताळ मोठ्या संख्येने साजरा करताना दिसतात. बदलत्या काळात म्हणजेच १९व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात परदेशी कंपन्या येऊ घातल्या काही भारतीय कंपन्यांनमध्ये FDA करण्यात आली यात आय टी सेक्टरचे नाव परमुख्याने घ्यावे लागेल. उद्योगाबरोबरच भारतात परदेशी संस्कृती आणि सण हे सुद्धा आले. आज मोठ्या उत्साहात आयटी कंपन्यांमध्ये देखील ‘सिक्रेट सांता’ ,खिसमस पार्टी या गोष्टींचा उत्सव साजरा केला जातो.

मराठी शाळांमध्ये देखील साजरा होतोय नाताळ

आपण काहीच वर्षे मागे गेलो तर मराठी शाळांमध्ये नाताळ तितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता जितका आज साजरा केला जातोय.आज इंग्रजी  माध्यमाच्या शाळांमध्ये सांताक्लॉज येऊन मुलांना भेटवस्तू देऊन जातो. तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये देखील आता संता लोकप्रिय  झाला आहे. त्या लाल  रंगाच्या  टोप्या सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री या सगळयांमुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद वाखाणण्याजोगा असतो.

मॉल संस्कृती आणि पार्टिजचा प्रभाव
आता भारतातल्या शहरांमध्ये साजरा  होणारा ख्रिसमस म्हणजे एकतर चर्च मध्ये जाऊन नाताळ साजरा करणे एकमेकांना भेटी देणं असे असते. जेव्हापासून मॉल संस्कृतीने भारतात पाऊल ठेवले तेव्हापासून कोणताही सण असो मॉल मध्ये साजरा करण्याचा ट्रेंडचा झुलाय असे म्हणायला काहीच हरकत नाही. नाताळ सणासाठी मॉल अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले आहेत. खरेदी करण्याबरोबरच फक्त एन्जॉय करण्यासाठी लोक तिथे गर्दी करतात. नाताळ सणाला पार्टी करण्याची परंपरा खुप आधीपासूनच आहे. आजही नाताळ म्हणातात की ख्रिसमस पार्टि हाच शब्द आजही प्रखरतेने वापरले जातो.

या सणात एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्र्परांचे अभिनंदन करण्यात येते. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ख्रिसमस वृक्ष सजावट(नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे.