पावसाचे खोटे अंदाज वर्तवणारं हवामान खातं बंद करा; संतप्त शेतकऱ्यांची मागणी

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होऊन हवामान खातं बंद करा अशी मागणी केल्याचे समोर येत आहे. हवामान खात्याकडून पावसाबाबत वारंवार चुकीचे अंदाज वर्तवले जात आहेत. या हवामान खात्याच्या भरवशावर राहून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, मराठवाड्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतातली पिकं करपून गेली आहेत. यामुळे सर्वच शेतकरी संतप्त झाले. करोडो रुपये हवामान खात्यावर खर्च करण्यापेक्षा हे खातंच बंद करावं, अशी मागणी संतापलेल्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे केली.

पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्याला जाब विचारण्यासाठी मराठवाड्यातील काही शेतकरी सोमवारी पुण्यातील हवामान खात्याच्या कार्यालयावर येऊन धडकले.  दरम्यान, हवामान कार्यालयाने शेतकऱ्यांच्या मागण्या दिल्लीकडे पाठवल्याचे लेखी स्वरूपात सांगितले. तसेच शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2205d01c-d099-11e8-8dbc-27673d5b00ab’]
मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज पुण्याच्या हवामान खात्याने पावसाळ्यापूर्वी वर्तवला होता. मात्र, आता संपूर्ण पावसाळ्याचा मोसमही निघून गेला मात्र, मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाचे सावट कायम असल्याचे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई थावरे म्हणाले, ‘यंदा हवामान खात्याने मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असे सांगितलेले अंदाज चुकले आहेत. या अंदाजानुसार आम्ही पेरणी केली मात्र, पाऊस न पडल्याने आमची सगळी पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे खोटे अंदाज वर्तवणे हवामान खाते बंद करावे.’ पूर्वी लोक आकाशाकडे बघून पाऊस पडेल की नाही हे सांगत, तेच आम्हाला आता योग्य वाटतंय, अशी भावनाही त्यांनी शेतकऱ्यांच्यावतीने व्यक्त केली.
Loading...
You might also like