#MeToo चे वादळ पुणे-पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयापर्यंत

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर सर्वत्र  #MeToo मोहिमेला सुरुवात झाली. या ‘मी टू’चे वादळ पुणे आरटीओ कार्यालयापर्यंत येऊन पोहचले आहे. पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cdd9bc3-d221-11e8-8411-27f2f5e3df6b’]

महिलेने चिखली पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुबोध मेडशीकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महिला ही पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्य़रत आहेत. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांनी पीडित महिलेसोबत असभ्य वर्तन केले आहे.

त्यांनी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या महिलेचे फोटो काढले तसेच त्या काम करत असताना अंगाला स्पर्श होईल असे उभे राहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तवणूक केली. तसेच सोबत जेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा हात पकडून करीयर संपवण्याची धमकी दिली. मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने आरोपीने महिलेला मेमो दिले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर याच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने आज चिखली पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करित आहेत. या त्रासाची तक्रार पीडित महिलेने विशाखा समितीकडे केली. त्यानंतर या समितीने चौकशी करून निर्णय दिला, मात्र तो निर्णय मेडशीकर यांना मान्य नाही. तसेच त्या अनुषंगाने स्थापन केलेल्या दिघावकर कमिटीचा अहवाल अद्याप पीडित महिलेस मिळालेला नाही, त्यामुळे अखेर पीडित महिला अधिकाऱ्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43782133-d221-11e8-b542-1770826029a6′]

भारतीय समाजात कधी नव्हे ते ‘मी टू’ चे वादळ घोंघावत असून, या वादळात अनेकांचा बळी जाणार असल्याची भाषा देखील एकीकडे सुरू झाली आहे. मात्र, हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार मुकाट्याने सहन करणारी भारतीय महिला चार भिंतीत असेल किंवा घराबाहेर असेल, अत्याचाराचे चटके सोसत असे. मात्र, या शोषणाविरोधात आता भारतीय महिला आपल्या विरोधात झालेला अन्याय अत्याचार ‘मी टू’ च्या माध्यमातून मांडू पाहत आहेत.