#MeToo : पुर्ण चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कारवाई झालीच पाहीजे

रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

पुणे | पोलीसनामा आॅनलाइन

सहकारी महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍यांची तपास यंत्रणांनी शहानिशा करून पुर्ण चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करावी. मग ते नाना पाटेकर असोत अथवा केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर असोत, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मत व्यक्त केले. तसेच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा चटका सर्वसामान्य जनतेला बसत असून हे दोन्ही जीएसटीमधून वगळावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da40d8e5-cfa0-11e8-9d91-97446b273d80′]

नवीन सर्किट हाउस येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी वरिल माहिती दिली. याप्रसंगी रिपाइंचे कोषाध्यक्ष एम.डी.शेवाळे, शहरअध्यक्ष अशोक कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे उपस्थित होते. आपल्या नेहमीच्या शैलीत बोलताना आठवले म्हणाले, की माझा मीटू शी संबध नाही, यू टूशी आहे. महिलांचा अवमान कोणी केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहीजे. परंतू कारवाई करण्यापुर्वी पोलिसांनी सर्व शहानिशा करावी. केवळ विनाकारण कोणाची बदनामी होउ नये. दोषी आढळणारे मग नाना पाटेकर असोत किंवा एम.जे. अकबर असोत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहीजे.

पुणे के बिबवेवाडी में सेक्स रैकेट का पर्दाफाश 

आगामी निवडणुकांबद्दल बोलताना आठवले म्हणाले, की लोकसभेमध्ये रिपाइंचे अस्तित्व नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मध्य मुंबईमधून मी निवडणूक लढविणार आहे. भाजप शिवसेना युती झाल्यास शिवसेनेने हा मतदारसंघ माझ्यासाठी सोडावा या बदल्यात पालघर मतदारसंघ त्यांनी घ्यावा. परंतू युती झाली नाही तर भाजपकडून हा मतदारसंघ रिपाइंला मिळण्यास काही अडचण नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांना विचारात घेउनच घेतला आहे. रिपाइं एनडीएतील घटक असला तरी रिपाइंचा स्वतंत्र अजेंडा आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत स्थापन केलेल्या बहुजन वंचित आघाडीमुळे भाजप आघाडीलाच लाभ होणार आहे. रिपाइं ज्या बाजूला असतो त्यांचे सरकार येते. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल, असा दावाही आठवले यांनी यावेळी केला. खासदार उदयनराजे भोसले यांनी रिपाइंकडून सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा माझा प्रयत्न आहे. यासाठी लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचा पुनरूच्चारही आठवले यांनी यावेळी  केला.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb19bf12-cfa0-11e8-bbfb-4d3fac9757fe’]

मागासवर्ग प्रवर्गाला पदोन्नतीसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा करावा लागणार आहे. हा कायदा करण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेउन यासाठी कायदा करण्याची विनंती करणार आहे. याप्रसंगी रिपाइंच्या प्रदेश अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक आयुब शेख यांची नियुक्ती केल्याचे आठवले यांनी जाहीर केले.

[amazon_link asins=’B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3c6823a-cfa0-11e8-bf67-679602388e91′]

पेट्रोल आणि डिझेल जीएसटीतून वगळावे
केंद्र आणि राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज आणि व्हॅट कमी करून जनतेला दरवाढीतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू यानंतरही इंधनाचे दर वाढलेलेच आहेत. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीतून वगळल्यास २० ते ३० रुपयांनी दर खाली येतील. यामुळे महागाई कमी होउन मध्यमवर्गीयांना याचा लाभ होईल. यासंदर्भात एनडीए घटक पक्षांच्या बैठकीमध्ये हा मुद्दा प्रकर्षान मांडू, असे आश्‍वासनही रामदास आठवले यांनी या परिषदेमध्ये दिले.