सर्जरी केली अन् जीवावर बेतली ! मॅक्सिकोच्या ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचा 29 व्या वर्षी मृत्यू

मॅक्सिको : वृत्तसंस्था – अमेरिकेची मॉडेल, फॅशन डिझायनर, इन्स्टाग्राम सेलिब्रिटी जोसलीन कॅनो हिला 29 व्या वर्षी जीव गमवावा लागला आहे. सुंदर, सुडौल दिसण्यासाठी तिने बट-लिफ्ट सर्जरी केली आणि हीच सर्जरी तिच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. जोसलीनचे मॉडेल जगतामध्ये मोठे नाव होते. मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ म्हणून तिला ओळखले जायचे. जोसलीचा 7 डिसेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जोसलीन बट-लिफ्ट सर्जरी करण्यासाठी कोलंबियाला गेली होती. मात्र, सर्जरी बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूच्या वृत्ताला कुटुंबियांकडून अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. कोलंबियातील न्यूपोर्ट बची येथील एका स्थानिक रहिवाश्याने तिच्या अंत्यसंस्काराचे यू ट्यूबवरुन लाईव्ह केले आहे. कोरोना माहामारीमुळे तिच्यावर ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जोसलीन केवळ 29 वर्षांची होती. तिचा जन्म 14 मार्च 1990 रोजी झाला होता. तिने वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. ग्लॅमरस स्टाईल आणि लुकमुळे तिला मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ म्हणून ओळखले जायचे. सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी तिने यापूर्वीही अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या. मात्र, बट-लिफ्ट सर्जरी तिच्या जीवावर बेतली. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्युमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. इन्स्टावर तिचे 13 मिलियन फॉलोअर्स होते.