325 जणांनी अमेरिकेत पोहचण्यासाठी सर्वकाही विकलं, ‘मेक्सिको’तून ‘त्यांना’ परत दिल्लीला पाठवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या जवळपास 325 स्थलांतरितांना मेक्सिको सरकारने परत स्वदेशात पाठवले आहे. या प्रयत्नात अनेक लोकांचे लाखो रुपये वाया गेले आहे. शुक्रवारी सकाळी बोइंग 747-400 चार्टर विमानाने या स्थलांतरितांना दिल्लीत आयजीआय एअरपोर्टला पोहोचवले. मॅक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या प्रवाशांना परत पाठवण्यात आले आहे ते सर्व 60 फेडरल मायग्रेशन एजंटच्या माध्यमातून पोहचले होते.

या स्थलांतरितांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. आवश्यक कागदपत्र नसून देखील ते मागील काही दिवसांपासून येथे राहत होते. या विमानात प्रवास करणारे गौरव कुमार नावाच्या व्यक्तीने सांगितले की आमच्या एजंटने आम्हाला जंगलात पाठवले, आम्ही जवळपास एका आठवड्यापासून जंगलात फिरत होतो. त्यानंतर आम्हाला मेक्सिकोमध्ये पाठवण्यात आले.

त्यांनी सांगितले की, फक्त भारतीयांनाच निर्वासित करण्यात आलेले नाही तर श्रीलंका, नेपाळ आणि कॅमेरुनच्या लोकांचा देखील यात समावेश आहे. ती व्यक्ती म्हणाली की आम्ही शेत जमीन आणि दागिने विकून एजंटला 18 लाख रुपये दिले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी