गृह मंत्रालयाने कोविड-19 रोखण्यासाठी जारी केले नियम, 30 एप्रिलपर्यंत राहतील लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गृह मंत्रालयाने कोविड-19 साठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. जे 1 एप्रिल 2021 ते 30 एप्रिलपर्यंत लागू राहतील. सरकारच्या निर्देशानुसार, केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये टेस्ट-ट्रॅक-ट्रीट अवलंबला जाईल. सरकारच्या निर्देशानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जिथे आरटीपीसीआर टेस्टची संख्या कमी आहे तिथे टेस्टची संख्या वाढवली जाईल आणि ती 70 टक्केवर आणली जाईल. चाचणीमध्ये आढळलेली पॉझिटिव्ह प्रकरणे लवकरात लवकर आणि वेळेवर उपचार करण्यासाठी आयसोलेट करण्याची आवश्यकता आहे.

सरकारच्या निर्देशानुसार कंटेन्मेंट झोनच्या बाहेर प्रवाशी रेल्वेगाड्या, विमान सेवा, मेट्रो रेल्वे सेवा, शाळा, उच्च शैक्षणिक संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्स, एंटरटेन्मेंट पार्क, योगा सेंटर आणि जिम, एक्जीबिशन इत्यादी कार्य्रकम सुरू राहतील. यामध्ये मानक संचालन प्रकियेचे पालन करणे अनिवार्य आहे.

1 एप्रिलपासून 45 वर्षापासून जास्त वयाच्या लोकांना लस

गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, प्रोटोकॉल अंतर्गत संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची लवकरात लवकर चाचणी केली जाईल आणि त्यांना आयसोलेट केले जाईल. संक्रमित प्रकरणांनुसार आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ट्रेस केल्यानंतर कंटेन्मेंट झोन ठरवले जातील. यासोबतच सरकारने व्हॅक्सीनेशन अभियान सुद्धा वेगाने पूर्ण करण्यावर जोर दिला आहे.

देशात 16 जानेवारीपासून लसीकारण अभियान सुरू झाले आहे. तर सरकारने घोषणा केली आहे की, एक एपिलपासून 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना कोविड-19 विरोधी लस घेण्यास पात्र असतील. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. बैठकीनंतर जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी म्हटले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की, आता 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व लोक लस घेण्यास पात्र असतील.