‘दुबई’मध्ये भारतीय उद्योगपतीनं इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून मारली उडी, आर्थिक अडचणींमुळं केली ‘आत्महत्या’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दुबईतील एका भारतीय उद्योगपतीच्या निधनानंतर, एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आले होते की दुबईतील एका भारतीय उद्योगपतीचा मृत्यू गेल्या आठवड्यात उंच इमारतीवरून पडल्यानंतर झाला होता. परंतु पोलिसांच्या तपासणीनंतर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे उघड झाले असून आर्थिक अडचणीमुळे त्याने आत्महत्या केली असे पोलिसांनी सांगितले.

केरळचे रहिवासी जॉय अरक्कल हे दुबई-मुख्यालयातील इनोवा ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक होते, या समूहाकडे विविध क्षेत्रे होती, ज्यांचे तेल क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष होते, दरम्यान 23 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या एका मित्राच्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी टाकत आत्महत्या केली. दुबई पोलिसांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीला याबाबतची माहिती दिली. बुर दुबई पोलिस स्टेशनचे संचालक ब्रिगेडिअर अब्दुल्ला खादिम बिन सोरोर म्हणाले की आर्थिक अडचणीमुळे या व्यावसायिकाने आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिकाचा मृतदेह परत मिळावा यासाठी कुटुंबीयांशी ते समन्वय साधत आहेत.

अरक्कल हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत जुमेरा येथे राहत होते. दुबईतील भारताचे वाणिज्यदूत विपुल यांनी एका वृत्तवाहिनीस सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना चार्टर्ड विमान रुग्णवाहिकेत जाण्यासाठी विशेष परवानगी दिल्यानंतर अरक्कल यांचे कुटुंब त्यांच्या मृतदेहासह घरी जाण्यास तयार आहे.