पंतप्रधान हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या 14 दहशतवाद्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; कोर्टाचा निर्णय

बांग्लादेश : वृत्तसंस्था –  बांग्लादेश मधील न्यायालयाने एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतवाद्यांना न्यायालयाने मृत्यूदंडांची शिक्षा सुनावली आहे. तर दहशतवाद्यांनी २००० साली पंतप्रधान शेख हसीना यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुनावणीसाठी ९ दोषींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यादरम्यान बांग्लादेश कोर्टाने हा निर्णय सुनावण्यात आला आहे.

तसेच न्यायाधीशांनी म्हटले आहे की, कायद्याने जर अडवणूक केली नाही तर फायरिंग पथकाकडून शिक्षेची अमलबाजवणी केली जाणार आहे. नाहीतर दोषींना फासावार लटकवलं जाणार आहे. तर बांगलादेश कायद्यांतर्गत मृत्यूदंडांच्या शिक्षेचा आढावा घेतल्यानंतर सर्वाच्च न्यायालयाच्या, उच्च न्यायालयीन विभागाच्या मान्यतेनुसार दोषींना फाशी देण्यात येईल असं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, हे सर्व दहशतवादी दोषी हे हरकत-उल जिहाद बांगलादेश संघटनेचे ऑपरेटिव्ह आहेत. इतर पाच दोषी फरार असून गैरहजेरीत त्यांच्यावरही खटला चालविला गेला. कायद्यानुसार राज्य-नियुक्त वकीलांनी त्यांचा बचाव केला होता. त्यांच्या अटकेनंतर किंवा आत्मसमर्पणानंतर निकालाची अमलबजावणी करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. तसेच हरकत-उल जिहाद बांगलादेशच्या दहशतवाद्यांना २१ जुलै २००० मध्ये गोपालगंज येथे ७४ किलो स्फोटकं लपवून ठेवत बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान हसीना यांची प्रचारसभा या ठिकाणी पार पडणार होती. मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी सभेपूर्वीच स्फोटकांची माहिती मिळवत एक मोठी दुर्घटना टाळण्याचे यश मिळवले.