कॅप्टनकडून लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लष्करी वसाहतीतील लष्करी अधिकाऱ्याने शेजारी राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एका कॅप्टनविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी सोमवारी सांयकाळी घरातील बाल्कनीमध्ये बसली होती. त्या वेळी कॅप्टन आपल्या घराच्या लॉनवर येऊन शेजारी राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीकडे पाहून अश्लील हावभाव करून अश्लील शेरेबाजी केली. तसेच सदर महिलेस दमदाटी केली.

शेजारी राहणाऱ्या कॅप्टनने केलेला हा विचित्र प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर महिलेने भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला येऊन फिर्याद दिली. त्यावरून सदर कॅप्टनविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us