Milk Price Hike | महागाईमध्ये आणखी भर! दुधाच्या किमतीमध्ये वाढ, आजपासून नवे दर लागू

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Milk Price Hike | लवकरच सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. मात्र यावर महागाईच्या (Inflation Rise) संकटाची टांगती तलवार आहे. यामध्येच भर म्हणून आता दुधाच्या किमती वाढत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रोजच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या खास करुन खाद्य पदार्थाच्या किमती रोज नवीन गगनभरारी घेत आहेत. आता मुंबईमध्ये असणाऱ्या मुंबई दूध उत्पादक संघाकडून (Mumbai Milk Producers Association) म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ (Milk Price Hike) करण्यात आली आहे. आता आजपासून (दि.1) मुंबईत म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 85 वरून 87 रुपये प्रतिलिटर होणार आहे.

दुधाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पण सध्या पाऊस सरासरी न पडल्यामुळे गुरांना देण्यात येणारे पशु खाद्य चारा महाग झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना देखील याचा फटका बसत असल्यामुळे म्हशीच्या दुधाचे प्रतिलिटर भाव (Buffalo milk Price Per Litre) हे दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय दूध उत्पादक संघाकडून घेण्यात आला आहे. या संघामध्ये सुमारे 700 हून अधिक डेअरी मालक व दुध उत्पादक आहेत. या मुंबई दूध उत्पादक संघाने वाढत्या महागाईबद्दल बैठकीमध्ये चर्चा केली. या दरम्यान म्हशीच्या दुधाच्या किंमतीमध्ये वाढ (Buffalo milk Price Hike) करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वाढीनंतर मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाच्या किरकोळ दरात 2 ते 3 रुपये प्रति लीटर अशी वाढ तर घाऊक दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

ADV

मुंबईमध्ये पार पडलेल्या या दूध उत्पादकांच्या बैठकीमध्ये 700 हून अधिक डेअरी मालक आणि 50,000 हून अधिक
म्हशी मालकांनी हजेरी लावली होती. यामध्ये वाढत्या महागाईचा फटका हा पशुखाद्यांच्या किमतीवर देखील झाले असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश दुबे (Ramesh Dubey) यांनी सांगितले की,
“अलीकडच्या काळात जनावरांचा चारा सुमारे 20 टक्क्यांनी महाग झाला आहे.
अशा परिस्थितीत आम्ही दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा दरांचा आढावा घेणार आहे.” असे त्यांनी सांगितले.
लवकरच सर्व राज्यभरामध्ये सण समांरभ सुरु होणार असून या महिन्यामध्ये कृष्णजन्माष्टमी
(Krishna Janmashtami 2023) व गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) सुरु होत आहे.
या काळामध्ये सामान्य लोकांची दुधाची मागणी वाढते. त्याचबरोबर दुधापासून बनवण्यात येणाऱ्या इतर पदार्थांची जसे पेढे,
बर्फी याची देखील खरेदी वाढते. पण आता दुधाच्या किमती वाढल्या असल्याने याचा फटका सामान्यांना बसणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या 10 महिलांसह 19 बांगलादेशींवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई

LPG Gas Cylinder Price | गॅसच्या किंमतीमध्ये आणखी मोठा बदल; सप्टेंबर महिन्यापासून नवे दर लागू