LPG Gas Cylinder Price | गॅसच्या किंमतीमध्ये आणखी मोठा बदल; सप्टेंबर महिन्यापासून नवे दर लागू

पोलीसनामा ऑनलाइन – LPG Gas Cylinder Price | देशामध्ये केंद्र सरकारतर्फे (Central Government) एलपीजी गॅसवर 200 रुपयांची सुट देण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मोदी सरकारकडून (Modi Government) घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर (Domestic LPG Gas Cylinder) ही भरघोस सुट देण्यात आली आहे. त्यामुळे गृहिणींसाठी ही आनंदाची बातमी ठरली होती. आता घरगुती गॅस सिलेंडर नंतर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर (Commercial LPG Cylinder) देखील सुट देण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून ही सूट जारी करण्यात आली असून सलग दुसऱ्या महिन्यामध्ये व्यवसायिक गॅस स्वस्त झाला आहे. आज (दि.1) पासून कमर्शियल गॅस स्वस्त झाल्यामुळे (LPG Cylinder Price) आता गॅस 1522.50 रुपयांना मिळणार आहे. या आधी मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये देखील कमर्शियल गॅसची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यामध्ये कमर्शियल गॅस महागला होता.

देशातील वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. या मध्ये एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळत आहे. त्यानंतर आता व्यवसायिक गॅस देखील स्वस्त झाला आहे. 19 किलोच्या कमर्शियल गॅस खरेदी करण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये 1680 रुपये मोजावे लागत होता आता मात्र तेल कंपन्यांनी किंमती केल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून कमर्शियल गॅससाठी 1522.50 रुपये (Commercial Gas Price In September) द्यावे लागणार आहेत. घरगुती पाठोपाठ कमर्शियल गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे कमी करण्यात आलेले नवे दर 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
आजपासून राजधानी दिल्लीत (Delhi) व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1680 रुपयांवरून 1522.50 रुपयांवर
आली आहे. तसेच कोलकातामध्ये (Kolkata) 1802.50 रुपयांऐवजी 1636 रुपये गॅस किंमत झाली आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) देखील 19 किलोच्या कमर्शियल गॅससाठी 1640.50 रुपये मोजावे लागत होते.
आता तेल कंपन्यांकडूनच ही सूट मिळाल्यामुळे आता 1482 रुपयांना (LPG Gas Cylinder Price) गॅस मिळणार आहे.
सणासुदीच्या तोंडावर करण्यात आलेली गॅस दरातील कपात सामान्यांना मदतशीर ठरत आहे.
दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅसच्या किंमती क्रेंद्र सरकारने कमी केल्या. 200 रुपयांची सूट घरगुती गॅससाठी मिळाली.
10 करोडो लाभार्थ्यांना सरकार कडून सबसिडी (Gas Subsidies) देखील मिळत आहे. त्यामुळे घरगुती गॅसचे 200 रुपये
कमी आणि 200 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. 903 रुपयांचा गॅस खरेदी केल्यानंतर खात्यामध्ये 200 रुपये जमा
होणार आहेत. आता घरगुती गॅस बरोबरच त्या पाठोपाठ व्यवसायिक गॅस देखील स्वस्त झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

01 September Rashifal : मिथुन, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना होणार धनलाभ, मिळेल नशीबाची साथ

Rules Changed From 1 September 2023 | १ सप्टेंबरपासून बदलले हे नियम, आयपीओपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमात झाला बदल