Pune Crime News | पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या 10 महिलांसह 19 बांगलादेशींवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Crime News | शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या 10 महिलांसह एकुण 19 बांगलादेशींवर (Bangladeshi Nationals In Pune) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) गुरूवारी रात्री मोठी कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या सगळयांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Pune Crime News)

बांगलादेशातुन विनापरवाना कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिकार्‍याच्या लेखी परवानगीशिवाय 10 मुली व 9 पुरूष यांनी भारतात अनाधिकृत प्रवेश करून पुण्यात बुधवार पेठेतील (Budhwar Peth Pune) कुंटणखान्यात वास्तव्य केले असल्याची माहिती तसेच त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व शाबित करणारे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आणि ते बांगलादेशी आहेत अशी माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. (Pune Crime News)

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बुधवार पेठेत छापा टाकला. तेथे 10 बांगलादेशी महिला आणि 9 पुरूष आढळून आले. त्यांना पोलसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव
(Sr PI Bharat Jadhav), सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote),
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे (API Rajesh Malegave), पोलिस अंमलदार अमेय रसाळ, सागर केकाण,
राजेंद्र कुमावत, बाबासो कर्पे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे आणि अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | गॅसच्या किंमतीमध्ये आणखी मोठा बदल; सप्टेंबर महिन्यापासून नवे दर लागू

Pune Police Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश