ताजमहलला वादळाचा तडाखा; मिनारसह घुमटही जमीनदोस्त

आग्रा : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात विविध भागात वादळी पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालालादेखील बसला आहे. ताजमहालाच्या प्रवेश द्वारावर असलेला खांब कोसळला आहे. या घटनेवेळी तेथे कोणीही नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. ताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणा-या ‘दरवाजा ए राऊझा’ प्रवेशद्वारावरील हा खांब बुधवारी मध्यरात्री कोसळला.