पडळकर कोणाचे ‘चमचे’ आहेत ?, मुश्रीफ यांनी साधला ‘या’ नेत्यावर निशाणा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपची (BJP) सत्ता आल्यानंतर एका दिवसात धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणाऱ्यांनी पाच वर्षात या समाजाला आरक्षण दिले नाही. तरीही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आमदार झाले. मग ते कोणाचे चमचे आहेत म्हणून त्यांना हे बक्षीस मिळाले असा सवाल ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला.

खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चमचे आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. पडळकर यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना मंत्री मश्रीफ यांनी घेतला. मागील सहा वर्षापासून पडळकर यांनी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले आणि भाजपचे सरकार येताच पहिल्याच दिवशी धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. पण पाच वर्षे त्यांनी हे आरक्षण दिले नाही. मात्र, पडळकर विधान परिषदेवर आमदार झाले. पडळकर यांना आश्वासन देऊनही आश्वासन पूर्ण केले नसताना त्यांना आमदारकी मिळाली. यावरून ते कोणाचे चमचे आहे, हे स्पष्ट होते. अशा शब्दात मुश्रीफ यांनी सुनावले.

धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे बक्षीस म्हणून पडळकर यांना आमदार करण्यात आले आहे. साडी नेसून नौटंकी करणारे अनेकजण पवारांनी पाहिले आहेत. त्यांची दखल घेण्याची आम्हाला गरज नहा. पडळकर जरी बोलत असले तरी त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे यांना आवरा, असा इशाराही मुश्रीफ यांनी यावेळी दिला.

वादाची ठिकणी कशी पडली ?
संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद पडळकर केला. त्यावर संतप्त झालेल्या पडळकरांनी राऊत यांना पत्र लिहून त्यांच्यावर निशाणा साधला. मी आपणास खरेतर शरद पवार यांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे म्हणायला हवे होते. मात्र ते माझे संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे आणि प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हे संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिले असल्याचे पडकर यांनी पत्रात नमूद केले होते. राऊत आणि पडळकर यांच्या वादात आता मुश्रीफ यांनी उडी घेत पडळकरांवर निशाणा साधला आहे.