मोदी सरकारचा आदेश, आता टीव्हीवरील मालिका आणि चित्रपटातील ‘या’ गोष्टी बदलणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीव्ही मालिकेच्या सुरवातीला आणि शेवटला दाखवण्यात येणाऱ्या शीर्षकांना भारतीय भाषांतदेखील दाखवण्याचे आदेश दिले आहेत. जावडेकर म्हणाले की, टीव्ही वाहिन्यांना आदेश देण्यात आला आहे की, टीव्हीवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या मालिकेच्या सुरवातीला आणि शेवटी बऱ्याच वेळेला इंग्रजी शीर्षकातून माहिती दिली जाते. भारतीय भाषांचा विकास होण्यासाठी हे शीर्षक त्याच भाषेतुन दिले पाहिजेत ज्या भाषेत मालिका दाखवली जाते.


जावडेकर म्हणाले की, भारतीय भाषांसह जर इंग्रजी भाषेत शीर्षक दाखवायची असतील त्याला आमची काही हरकत नाही. आम्ही कोणतेही बंधन घालत नाही आहोत. आमचा उद्देश भारतीय भाषांचा विकास करणे हा आहे. आम्ही चित्रपटांसाठी देखील अशाप्रकारचा आदेश लागू करणार आहोत.

काहीच दिवसांपुर्वी भाषेवरून सरकारला घ्यावी लागली होती माघार

या आधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी शैक्षणिक धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला होता. ज्यामध्ये तीन भाषेच्या सूत्रानुसार हिंदी भाषेला अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दक्षिण भारतातील राज्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. शेवटी सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.

सिने जगत – 

#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

‘या’ अभिनेत्याचा ‘फेक’ फोटो सोशलवर शेअर केल्याने 2 महिलांसह 5 जणांविरूध्द तक्रार दाखल

You might also like