Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीची संधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; 400 पदांसाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या तरूणांना नोकरीची संधी आहे. संरक्षण मंत्रालयाने एएससी सेंटर, उत्तर, अंतर्गत सिव्हिल मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर आणि एएससी सेंटर नॉर्थ अंतर्गत एमटीएस आणि लेबरच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जाहिरात जारी झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ऑफलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज (Ministry of Defence Recruitment 2021) करू शकतात.

रिक्त पदांची माहिती

– सिव्हिल मोटर ड्रायव्हर – 115 पदे

– क्लीनर – 67 पदे

– कुक – 15 पदे

– सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर – 3 पदे

– कामगार – 194 पदे

– एमटीएस – 7 पदे

एकूण 400 पदांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख
– 17 सप्टेंबर 2021

वेतनमान

– सिव्हिल मोटर ड्रायव्हर, कुक आणि सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900 रुपये वेतन मिळेल.

– क्लीनर, लेबर आणि एमटीएस पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 18000 रुपये पगार मिळेल.

पात्रता

– उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

– सिव्हिल केटरिंग इंस्ट्रक्टर, क्लीनर, कुक, लेबर आणि एमटीएस या पदावर भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असावे.

– सिव्हिल मोटर ड्रायव्हर पदावर भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे.

अशी होईल निवड प्रक्रिया

– कौशल्य / शारीरिक / प्रात्यक्षिक चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

– सविस्तर माहितीसाठी  अधिकृत अधिसूचना पहा.

असा करा अर्ज

– एएससी सेंटर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स रिक्रूटमेंट 2021 मध्ये लेबर आणि एमटीएस पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह ‘पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, सीएचक्यू, एएससी सेंटर (दक्षिण) – 2 एटीसी, आग्रा पोस्ट, बंगलोर – 560007’ येथे पाठवावेत.

– इतर पदांसाठी, पीठासीन अधिकारी, नागरी थेट भरती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1ATC, आग्रा पोस्ट, बंगळुरू – 560007’ या पत्त्यावर पाठवावे.

हे देखील वाचा

Heart Disease | आक्रोड खाल्ल्याने कमी होतो हृदय रोगांचा धोका, 8.5% पर्यंत कोलेस्ट्रॉलचा स्तर करते कमी – रिसर्चमध्ये दावा

Gangster Nilesh Ghaiwal | गँगस्टर नीलेश घायवळला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ministry of defence recruitment 2021 notification released for various group c posts direct apply here check eligibility criteria

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update