संतापजनक ! 16 वर्षीय मुलीवर 62 वर्षाच्या थेरड्याचा बलात्कार, व्हिडीओ बनवला अन् केलं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका ६२ वर्षीय व्यक्तीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ तिच्या मोबाइलवर काढला. हा व्हिडिओ दाखवून आरोपींनी अनेकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. नंतर जेव्हा त्याचे मन भरले त्यानंतर आरोपीने पीडितेच्या चुलत बहिणीला हा व्हिडीओ पाठवला. त्या वृद्ध व्यक्तीने हा व्हिडिओ अल्पवयीन मुलीच्या चुलत बहिणीला पाठवला आणि सांगितले की मी तुझ्या बहिणीवर बलात्कार केला आहे आणि मी हा व्हिडिओ बनविला आहे. तर तु ही माझ्याशी शारिरीक संबंध ठेवा, नाहीतर मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल.
rape-2
यावर अल्पवयीन मुलीच्या चुलत बहिणीने ही घटना आपल्या कुटुंबाला सांगितली. कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. ही लाजीरवाणी घटना भरतपूरची आहे, जिथे दहावीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आईचा ६ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. आरोपीच्या जवळच तिच्या वडिलांनी भाड्याने दुकान घेतले होते जेथे तो चहाचे दुकान चालवत असे.

पीडित मुलगी आपल्या वडिलांना भोजन देण्यासाठी दुकानात जात होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा ती आपल्या वडिलांना भोजन देण्यासाठी दुकानात पोहोचली तेव्हा वयोवृद्ध दुकानदाराने त्याच्या दुकानात अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ बनविला.

नंतर, मुलीला धमकी दिली की जर तिने कोणाला सांगितले तर हा अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल ज्यावर त्याने पीडित मुलीवर अनेकदा बलात्कार केला. कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पीडितेला रुग्णालयात नेले आणि तिचे मेडिकल केले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –