अल्पवयीन कामगाराचा टँकमध्ये गुदमरून मृत्यू 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – येथील ग्रॅनोज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पाच हजार टन क्षमतेच्या मका सायलो टाकीत गुदमरून एका १७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर कंपनी प्रशासन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ग्रामस्थांना याची कुणकुण लागताच त्यांनी घोषणाबाजी करत कंपनी बंद पाडली.
[amazon_link asins=’B078124279,B0745BNFYV,B0784BZ5VY,B01M0JSAFU,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3192cd27-d1ff-11e8-be8d-07e174ce429d’]
राहुल हरिश्चंद्र तेलंगे (१७, रा. भेंडाळा) असे मृत कामगाराचे नाव असून तो भेंडाळा शिवार गट क्र. २३८/३९ येथील अल्कोहोलनिर्मिती करणाऱ्या ग्रॅनोज कंपनीत सकाळच्या शिफ्टमध्ये कामाला आला होता. दुपारी सुपरवायझरने कंपनीतील मका साठवण करण्याच्या सायलो टाकीच्या बेल्टमध्ये अडकेली मका काढण्यास त्यास सांगितले. विशेष म्हणजे १०० फूट उंच असलेल्या या टाकीवर चढताना राहुलच्या मदतीला कोणीही नव्हते. मका काढताना राहुलचा अचानक तोल जाऊन तो टाकीत पडला. टाकीत पडताच त्याच्या अंगावर मका पडली. त्यातच त्याचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना दाबण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन व अधिकाऱ्यांनी केला. मात्र स्थानिक कामगारांना कुजबूज लागताच त्यांनी घटनास्थळी येऊन घोषणाबाजी करत अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत कंपनी बंद पाडली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करून दोषींना अटक करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी केली. तहसीलदार अरुण जऱ्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सोनवणे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मृतदेह काढण्यासाठी गॅस कटरच्या सहाय्याने टाकी कापण्यात आली. तसेच आतील मकाही बाहेर काढण्यासाठी तीन जेसीबी लावण्यात आले होते.
[amazon_link asins=’B06XNRY7S1,B075RFNV5G,B0113WSN16,B075CNTTD8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f9a4333-d1ff-11e8-b65a-a52ca83f1849′]
दिडशे पोलिसांचा बंदोबस्त असतानाही जगदंबा मंदिरात चोऱ्या
नगर : कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, होमगार्ड असा दीडशे जणांचा बंदोबस्त असतानाही मंदिरात चोऱ्या होत आहेत. या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक येत असतात. पहाटे चारपासून रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर गर्दीने फुललेले आहे. याचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे दागिने लंपास करत आहेत. नवरात्रौत्सव सुरू झाल्यापासून येथे अनेक महिलांचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. यावर्षी मंदिरात १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच डड्ढोनव्दारेही लक्ष ठेवले जात आहे. तरीही चोऱ्या होत आहेत.

जाहिरात