पती शाहिदसोबत स्क्रिन शेअर करणार  मीरा राजपूत

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी शाहिदने मीरासाठी एक ‘बेबी शॉवर पार्टी’  ठेवली होती. मीरा आता लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. यामुळे ते जास्त चर्चेत आहेत.नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शाहिद कपूर आणि मीरा राजपूत  हे आता एकत्र स्क्रीनवर  काम करणार आहेत. या जोडीला स्क्रीनवर काम करताना पाहणे कुणाला आवडेल अशी हि जोडी आहे. शाहिदची पत्नी मीरा तशी बॉलिवूडच्या बाहेरची आहे. तिचा बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण तिने शाहिदची पत्नी होताच,अगदी सहज  तिने या इंडस्ट्रीशी जुळवून घेतलं. शाहिदच्या मित्रांसोबत पार्ट्या करण्यापासून, ते त्याच्यासोबत वेगवेगळ्या इव्हेंटला जाणे, अवार्ड फंक्शनला जाण्यापासून तर बड्या मॅगझिनसाठी फोटोशूट करण्यापर्यंत सगळं काही अगदी सहजरित्या तिने स्वीकारलं. लग्न झाल्या झाल्या  तिने करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्येही ती शाहिदसोबत आली होती. अगदी त्या वेळेपासून  मीराच्या अ‍ॅक्टिंग डेब्यूची चर्चा होती.

[amazon_link asins=’B07CRGDR8L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’51f8e647-90a5-11e8-993d-e7aef876ad90′]

कालपरवा मीराने एका बेबी प्रॉडक्ट्ससाठी शूट केले आणि आता शाहिद व मीरा दोघेही एका मोठ्या ब्रँडची जाहिरात करताना दिसणार आहेत. एका घरगुती उपकरणांच्या ब्रॅण्डने ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर’ म्हणून मीरा व शाहिद या जोडप्याला साईन केल्याचे समजलं आहे.  मीरा अतिशय सुंदर अभिनय करते. तसेच ती कॅमेरा फ्रेंडली आहे. तिला कॅमेराशी  सामना  करण फार सोपं गेलं आहे.

माहितीनुसार कालपरवा एका बेबी प्रॉडक्टसाठी शूट करताना, अगदी पहिल्या टेकमध्ये मीराने सीन पूर्ण केले आहेत. ती नवखी आहे, असं या  सेटवर  कोणालाही जावणलेदेखील नाही. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. म्हणजेच  काय तर मीरामध्ये अ‍ॅक्टिंग हा  गुण आहे. तो लोकांना जाणवूही लागला आहे. त्यामुळे येत्या काळात मीरा बॉलिवूडमध्येही  दिसणार आहे.

मीरा आणि शाहिदच ७ जुलै २०१५ रोजी लग्न झालं होते. मीराला २  वर्षांची एक छोटीशी मुलगी आहे. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. मीरा लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.