मिरज : दिल्लीच्या व्यापाऱ्याकडून बेडगेतील शेतकऱ्यांची १० लाखांची फसवणूक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

मिरज तालुक्यातील बेडग येथील दोन शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करून पैसे न देता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. दिल्ली येथील व्यापाऱ्याने बेडगेतील शेतकऱ्यांकडून १२ लाख ५० हजार रुपयांचे द्राक्ष खरेदी केले. त्यापैकी दोन लाख पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांने देऊन दहा लाखांची फसवणूक केली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात व्यपाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07DKRCZXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7735239-82c0-11e8-bab5-f52c65cc5169′]

या प्रकरणी वैभव शहाजी पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मिरज तालुक्यातील बेडग येथील रामचंद्र पाटील, सुरेश लक्ष्मण पाटील यांची द्राक्षबाग आहे. त्यांच्या बागेतील बारा लाख सत्तर हजार रुपयांचे द्राक्षे गिरीश गाभा या दिल्लीच्या व्यापार्‍याने विकत घेतले. त्या व्यापार्‍याने बारा लाख सत्तर हजार रुपयांपैकी दोन लाख पन्नास हजार रुपये शेतकर्‍यांना दिले. उर्वरीत दहा लाख वीस हजार रुपयांची रक्कम त्या व्यापार्‍याने शेतकर्‍यांना दिलीच नाही. हा फसवणुकीचा प्रकार 7 फेब्रवारी 2017 ते 25 फेब्रवारी 2017 दरम्यान घडला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी गिरीश गाभा या व्यापार्‍यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.