मिरज : मुलाखतीच्या वेळी भाजप इच्छुक उमेदवाराने दाखवला 30 लाखांचा धनादेश

मिरज : शहर प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीने आज (सोमवार) कुपवाड आणि मिरज येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती दरम्यान जिल्हा उपाध्यक्षांनी उमेदवारी देण्यासाठी जर पैशांचाच निकष लावणार असाल तर हा घ्या 30 लाख रूपयांचा धनादेश, असे म्हणून जिल्हा उपाध्यक्षाने मुलाखतीच्या वेळी कोअर कमिटीसमोर धनादेश दाखविल्याने एकच खळबळ उडाली.

[amazon_link asins=’B071HTGC1R’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c78883d7-7e0c-11e8-bf30-11c4f2e3600a’]

आज दिवसभर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे महापालिका निवडणुकीसाठीचे प्रभारी अतुल भोसले, प्रदेश संघटक रवी अनासपुरे, नीता केळकर, मकरंद देशपांडे, दीपक  शिंदे, दिनकर पाटील, शेखर इनामदार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

मुलाखतीसाठी काही उमेदवार शक्तीप्रदर्शन करीत आले होते. तर काही उमेदवार गाजावाजा न करता मुलाखतीस आले होते. काही महिला उमेदवारांच्या पतींनी मुलाखत दिली. राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अन्य पक्षातून आलेल्या आजी – माजी नगरसेवकांनीही यावेळी मुलाखती दिल्या.

मुलाखती सुरू होऊन तीन तास होऊन गेले तरीही अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेला एकही इच्छुक मुलाखतीच्या ठिकाणी आला नव्हता. त्यामुळे ते मुलाखतीला येणार की नाही, याची चर्चा तेथे रंगली होती. मात्र काही वेळाने ते सर्वजण एकत्रच मुलाखतीसाठी दाखल झाले. माजी महापौर व आजी माजी नगरसेवकांनी मुलाखती दिल्या.

भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन चौगुले यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी कोअर कमिटीला  30 लाख रूपयांचा धनादेश दाखविला. त्यामुळे मुलाखतीदरम्यान एकच खळबळ उडाली. त्यानंतर कोअर कमिटीनेही त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.

[amazon_link asins=’B06XFZC3BX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e287867c-7e0c-11e8-a32e-fd2f4c7923af’]