मिरज  : महिलेकडूनच वृद्धे महिलेची 42 लाखांना फसवणूक 

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

मिरज येथील एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेला प्रिती सिंह नावाच्या एका महिलेनेच तब्बल 42 लाख 50 हजार रूपयांना गंडा घातला आहे. पतीच्या निधनानंतर विम्याचा क्लेम करून 82 लाख रूपये मिळवून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे.

याबाबत सविता अरूण सुर्यवंशी (रा. कुपवाड रस्ता, गव्हर्नमेंट कॉलनी, मिरज) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा फसवणूकीचा प्रकार मे 2017 ते दि. 23 मार्च 2018 या दरम्यान घडला आहे.

[amazon_link asins=’B073PCKHHV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e1f365d-7bb9-11e8-b1d4-a9fa125089d4′]

सविता सुर्यवंशी यांना 08010981816 या क्रमांकावरून प्रिती सिंह नावाच्या महिलेने फोन केला. तुमचे मिस्टर मयत झाल्यानंतर तुम्ही विम्याचा क्लेम केला नाही. त्यामुळे तुमच्या पतीचे पैसे शासनाकडे अडकले आहेत. तुम्ही आमच्याकडे विमा भरा त्यानंतर तुम्हाला 82 लाख 28 हजार 267 रूपये मिळतील. पण त्यासाठी काही रक्कम आमच्याकडे भरावी लागेल, अशी बतावणी त्या महिलेने केली. त्यानंतर सांगली अर्बन बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक या तिन बँकांमधून प्रिती सिंह या महिलेने एक वर्षाच्या कालावधीत 42 लाख 50 हजार 220 रूपये काढून घेतले. इतके पैसे देऊनही 82 लाख रूपये मिळत नसल्याने त्या सर्व पैशाची मागणी सविता यांनी प्रिती सिंह यांच्याकडे केली. पण त्यांनी पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रक़रणी पोलिसांनी प्रिती सिंह या महिलेविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. प्रिती सिंह या महिलेचा पत्ता नसल्याने पोलिसांनी तिच्या मोबाईल क्रमांकावरून तपास सुरू केला आहे.