Mirzapur Season 3 | OTT वरील मिर्झापूर वेब सिरीजबद्दल मोठी अपडेट आली समोर; मुन्नाच्या मृत्यूचा बदला घेणार त्याची बायको…

पोलीसनामा ऑनलाइन – Mirzapur Season 3 | चित्रपटाप्रमाणेच OTT प्लॅटफॉर्म वरील सिरीज देखील आता खूप गाजत आहे. त्यापैकी करण अंशुमन (Karan Anshuman) दिग्दर्शित मिर्झापूर (Mirzapur Series) ही अत्यंत गाजलेली गुन्हेगारीवरील थरारक सिरीज आहे. मिर्झापूरचे आत्तापर्यंत दोन सिझन आले असून त्यांनी OTT वर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सोशल मीडियावर या मिर्झापूरचे मिम्स (Mirzapur Memes) आजही प्रसिद्ध आहे. आता प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनचे वेध लागले आहेत. दरम्यान मिर्झापूर 3 या सिरिजबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Mirzapur Season 3)
मिर्झापूरमध्ये माधुरी यादवची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा तलवार (Actress Esha Talwar) हिने पुढच्या सिझनबद्दल एक अपडेट दिली आहे. माधुरी ही मुन्ना भैय्याची पत्नी होती. मात्र, मिर्झापूर सीझन २ मध्ये गुड्डू पंडित (अली फजल) मुन्नाला शूट करतो. आता ईशाने मालिकेच्या कथेबाबत एक नवीन अपडेट सांगितली आहे.
‘मिर्झापूर 3’ मधील ईशा तलवार म्हणाली आहे की, ज्याप्रमाणे आपण सीझन 2 मध्ये पाहिले होते, शेवटी ‘कलिनभैय्या’कडून जवळजवळ सत्ता हिसकावून घेतली होती, त्याची अप्रतिम भूमिका पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) साकारली होती. जेव्हा तुम्ही शोमध्ये एवढी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारता तेव्हा हाय-ऑक्टेन ड्रामा पाहण्यासाठी तयार रहा. ‘मुन्ना’च्या मृत्यूबद्दल प्रेक्षक अजूनही संभ्रमात आहेत असं मला वैयक्तिक अनुभवावरून माहित आहे. या क्षणी, मी शोबद्दल अधिक काही उलघडून सांगू शकत नाही. शो रिलीजच्या जवळ आल्यावर अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल.
या वेब सिरिजच्या तिसऱ्या सिझनची स्टोरी ही दुसर्या भागालाचा जोडून असू शकते. मात्र मुन्नाच्या मृत्यूनं
प्रेक्षक अजूनही गोंधळलेले आहेत, मला वैयक्तिक अनुभवावरून हे माहित आहे.’ असे मत ईशाने मांडले आहे.
मिर्झापूर सीझन 3 मध्ये, ईशा मुन्ना भैय्याच्या विधवा बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या
पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती गुड्डू पंडित म्हणजेच अली फजल (Ali Fazal) आणि गोलू गुप्ता यांना
भिडणार आहे. तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेणार आहे.
गुड्डू भैया फेम अली फजलने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग डिसेंबर 2022 मध्येच
पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे प्रेक्षकांना ड्रामा सस्पेन्स आणि धमाकेदार अॅक्शन असणाऱ्या
मिर्झापूर सीझन 3 ची (Mirzapur Series Season 3) उत्सुकता लागली आहे.
अजूनही प्रेक्षकांना अपेक्षा आहे की मुन्नाचा मृत्यू झाला नसून तो पुन्हा या सिरिजमध्ये धमाकेदार एंट्री होणार आहे.
Web Title : Mirzapur Season 3 | Big update about Mirzapur web series on OTT
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Kashish Social Foundation | कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने 25 हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप