Devendra Fadnavis | FDI मध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर वन, उद्योग बाहेर गेले म्हणणाऱ्यांची तोंडं बंद झाली; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशातील उद्योगांद्वारे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (FDI) महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्राने इतर राज्यांना मागे टाकले असून या आर्थिक वर्षात 1 लाख 18 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक (Foreign Investment) महाराष्ट्रात (Maharashtra) आली आहे. ही आकडेवारी बघितल्यानंतर उद्योग इकडे गेले असं बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात पंप स्टोरेजच्या संदर्भात आज 13 हजार 500 मेगावॅटचे करार करण्यात आले. याची माहिती देताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1666001934480982016?s=20

महाराष्ट्र पुन्हा नंबर वन

2020 ते 2022 या कालावधीत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला होता. परंतु 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार कोटी रुपयांची परदेशी गंतवणूक आली. 2021-22 च्या तुलनेत हा आकडा 4 हजार कोटींनी अधिक आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटक या राज्यांना मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक पटकवला आहे.

उद्योग गेले म्हणाऱ्यांची तोंडं बंद झाली

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्याने आज केंद्र सरकार आणि खासगी कंपन्यांसोबत पंप
स्टोरेज (Pump Storage) संदर्भात 13 हजार 500 मेगावॅटचे करार केले आहेत. याद्वारे 71 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर 30 हजारांपेक्षा अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. पंप स्टोरेज हा जगात सर्वात अपारंपारिक स्त्रोत म्हणून स्वीकारला आहे. या सर्वात मोठा करार आहे. काल FDI चे आकडे जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र नंबर वनवर गेला आहे. ही आडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले हे बोलणाऱ्यांची तोंड बंद झाली आहेत.

श्वेतपत्रिका काढा – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना सरकारचा महाराष्ट्र नंबर वनचा दावा मान्य नाही.
राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात गेले. त्यामुळे रोजगार बुडाला, राज्याला फटका बसला.
आधी उद्योगांवरची श्वेतपत्रिका काढा, त्यात परकीय गुंतवणूक वाढलेली दिसली तर सरकारचे अभिनंदनच करु,
अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.

Web Title : Devendra Fadnavis | maharashtra is again number one in fdi claims devendra fadnavis attacks opposition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे पुन्हा हादरलं ! प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्‍या पतीची पत्नी व मुलीकडून हत्या; क्राईम वेब सिरीज पाहून केलं काम ‘तमाम’ (Video)

NCP Foundation Day | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली जय्यत तयारी पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला; कारण…

Bal Shivaji Movie Teaser | 350 व्या शिवराज्याभिषेक दिनी रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचा टीझर आऊट; बाल शिवरायांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता