आणखी एक टेन्शन ! मुलांमध्ये कोरोनानंतर आता ‘या’ आजाराने वाढवली चिंता, जाणून घ्या काय आहे नवीन संकट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना संसर्गातून बरे झालेल्या मुलांमध्ये दोन ते सहा आठवड्यात मल्टीसिस्टम इम्फ्लेमेंटरी सिंड्रोम (MIS) ची प्रकरणे दिसून येत आहेत. यामध्ये मुलांना ताप येणे, शरीरावर लाल चट्टे होणे, डोळे येणे, धाप लागणे इत्यादी लक्षणे दिसत आहेत.

उपचारासाठी लवकरच मार्गदर्शक तत्व

उलटी, डायरिया, थकवा ही लक्षणे सुद्धा असू शकतात.
मात्र केंद्र सरकारनुसार, ही एक आपत्कालीन स्थिती आहे आणि वेळीच उपचार सुरू झाले तर जास्त कठिण नाही.
उपचारासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली जात आहेत.

‘झायडस कॅडिला’च्या ‘अँटिबॉडी कॉकटेल’ला वैद्यकीय चाचणीची परवानगी

मल्टीसिस्टम इंफ्लेमेंट्ररी सिंड्रोम (MIS) म्हणजे काय

तज्ज्ञांनुसार, ही लक्षणे कोरोनाशी मिळती-जुळती आहेत परंतु आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येते.
कोरोनामध्ये संसर्ग फुफ्फुसात होतो एमआयएसमध्ये (MIS) असे वाटते की, आजार शरीराच्या एका सिस्टममध्ये नव्हे तर सर्व ठिकाणी आहे, यासाठी यास मल्टीसिस्टम इंफ्लेमेंट्ररी सिंड्रोम (MIS) म्हटले जाते.
अशावेळी कोरोना महामारीची तिसरी लाट मुलांसाठी जास्त धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशाप्रकारची लक्षणे चिंताजनक आहेत.

दोन प्रकारचा संसर्ग

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्यानुसार, मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग दोन प्रकारचा दिसून येतो.
एक कोरोनाचा संसर्ग झाला आणि घरात किंवा हॉस्पिटलमधील उपचारानंतर मुले ठिक झाली.
संसर्गातील 2-3 टक्के प्रकरणात मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता भासत आहे.

आमची तयारी याच्या दुप्पट – सरकार

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, पण आमची तयारी याच्या दुप्पट किंवा यापेक्षा जास्त आहे, यासाठी मुलांमध्ये दाखल होण्याची कोणतीही समस्या नाही.
त्यांनी म्हटले की, सरकार मुलांमध्ये होणार्‍या कोरोनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
याचे उपचार धोरण ठरवण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा गट तयार केला होता, ज्याने आपला रिपोर्ट सोवला होता लवकरच त्यानुसार मार्गदर्शक तत्व जारी केली जातील.

महामारीची प्रवृत्ती बदलली तर धोका

पॉल यांनी म्हटले आतापर्यंत मुलांमध्ये कोरोना संसर्ग कमी होत आहे आणि बहुतांश प्रकरणात कोणतेही लक्षण प्रकटसुद्धा होत नाहीत. परंतु जर व्हायरसने आपल्या वर्तणुकीत काही बदल केला किंवा प्रवृत्ती बदलली तर धोका वाढू शकतो.
या प्रकरणात सतत शास्त्रीय माहिती अपडेट केली जात आहे. सरकार नवीन पद्धतीने या आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे.