World Beard Day 2020 : जास्त हँडसम दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ बियर्ड स्टायलिंग टीप्स

पोलिसनामा ऑनलाइन – आजचा दिवस (दि 5 सप्टेंबर रोजी) जगभरात वर्ल्ड बियर्ड डे म्हणून साजरा केला जात आहे. बियर्ड लुकला जागतिक पातळीवर पोत्साहन देणं हा याचा हेतू आहे. असं मानलं जातं की, या लुकमध्ये पुरुष जास्त हँडसम दिसतात. यामुळं व्यक्ती खुशदेखील राहतो. अशात आजच्या काळात लोक जास्त बियर्ड ठेवताना दिसत आहेत. अशात आता आपण बियर्डची देखभाल कशी करावी यासाठी काही टीप्स जाणून घेणार आहोत.

अशी ठेवा मेंटेन

प्रत्येक 2 आठवड्यांनी दाढी ट्रीम करा. 3-4 दिवसांनी आपले गाल आणि जॉ लाईनला साफ करा. यासाठी तुम्ही बियर्ड शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करू शकता. बियर्ड ऑईल वापरणंही फायदेशीर ठरतं. यामुळं बियर्ड चांगली राहते आणि चांगली दिसते.

योग्य प्रॉडक्ट्स वापरा

– जास्त रूंद तोंड असणारा ट्रीमर वापरा. यामुळं एकाच स्ट्रोकमध्ये चांगल्या प्रकारे दाढी ट्रीम होईल.
– ट्रीमरचे ब्लेड टायटेनियम कोटेड असतील याची काळजी घ्या. जेणेकरून ट्रीमर जास्त काळ टिकेल.
– बियर्ड ऑईल, शॅम्पू, ड्रायर आणि बियर्ड कॉम्बसाठी खर्च करा.

किती अंतरानं धुवावी बियर्ड ?

– 2-3 दिवसातून एकदा बियर्ड धुतली गेली पाहिजे. बियर्ड प्रॉडक्ट वापरताना ज्यामुळं दाढी सॉफ्ट होईल असे निवडा.

हे फॉलो करा

– सुरुवातीपासूनच बियर्डला शेप द्यायला सुरू करा.
– जी कोणती बियर्डची स्टाईल असेल ती स्विकार करा.
– बियर्ड वाढण्यासाठी वेळ द्या.
– सुरुवातीला खाज येण्याची समस्या येऊ शकते.

‘या’ चूका टाळा

– पॅची बियर्ड चांगली नाही असा विचार करू नका.
– दाढी वाढवण्यासाठी कोणतीही मेडिकल बियर्ड ग्रोथ ट्रीटमेंट करू नका.
– ग्रुमिंग प्रॉडक्टच्या क्वालिटीसोबत तडजोड करू नका.