MLA Ashish Shelar | ‘दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात…’, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ashish Shelar | मुंबईत शनिवारी (दि.24) झालेल्या पावसाने (Mumbai Rain) अनेक भाग जलमय झाले. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. आमच्याकार्यकाळात 300 मिमी आणि 400 मिमी तासाला पाऊस पडत होता. तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवत होतो, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

ट्विट करत आशिष शेलार (MLA Ashish Shelar) म्हणाले, तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली. म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले.

मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? (Cherrapunji Rain) मुंबईत 26 जुलै 2005 ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर!, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या (Matoshree) बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात
हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी!, अशा शब्दात शेलार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

Web Title :  MLA Ashish Shelar | ashish shelar taunt aaditya thackeray over 400 mm rain in mumbai comment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा