MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंनी सरकारला खडसावलं, मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? ‘त्यांचा…’

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत? मराठ्यांचा आरक्षणावर (Maratha Reservation) अधिकार नाही का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत प्रहारचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी सरकारला (State Government) खडसावले आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार विलंब लावत असल्याने कडू (MLA Bacchu Kadu) यांनी हा संताप व्यक्त केला.

बच्चू कडू म्हणाले, देशात ओबीसींचा वाटा जास्त आहे. पण, ओबीसींना मिळालेले आरक्षण (OBC Reservation) कमी आहे. २७ टक्क्यांच्यावर ओबीसींना आरक्षण नाही. ओबीसी आरक्षणात वाढ करून त्यात अ, ब, क, ड असे वर्ग करा. मराठा समाजाला ओबीसीमधून थेट आरक्षण नाही म्हणणे, हे चुकीचे आहे.

बच्चू कडूंनी प्रश्नांची सरबत्ती करताना म्हटले की, मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत का? मराठ्यांना आरक्षणाचा अधिकार नाही का? मराठ्यांचे मागासलेपण सरकारला माहिती नाही. मग, मराठ्यांना आरक्षण का नाकारता?

सरकारवर टीका करताना बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) म्हणाले, महाराष्ट्रात वाढत चाललेला भेदभाव चुकीचा आहे. राज्यात सगळीकडे मराठा-कुणबी आहेत. फक्त मराठवाड्यात मराठा लिहिल्याने चालत नाही. संत तुकाराम महाराजांनी स्वत: सांगितले की, ‘बरे झाले देवा कुणबी झालो’. ते मोरे ‘मराठा’ लिहितात. इतकं स्पष्ट असताना आरक्षण नाकारणे म्हणजे जाणीवपूर्वक पळवाट काढल्यासारखे आहे.

बच्चू कडू म्हणाले, ज्यांनी मोगलांच्या तलवारी छातीवर घेतल्या, त्यांच्याच छातीवर सरकार तलवारी चालवत असेल, तर तुमची तुलना मोगलांबरोबर करण्याची वेळ येऊ नये.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | दिवाळीनंतर ‘मास्टरस्ट्रोक’! जातीच्या गणिताचा तोडगा भाजपनं शोधला, यावेळेला मिशन 60