वंचितमुळे ‘या’ आमदाराला ‘हॅट्रीक’ करण्याची संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी तर अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवातही सुरु केली आहे. आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांशी संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे. त्यासाठी बाळापूर मतदार संघातील भरीप बहुजन महासंघाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा याच मतदार संघात बाजी मारत हॅट्रीक करण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत.

baliram-siraskar

गेल्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात ५ पैकी ४ विधानसभा मतदार संघात भाजपला यश मिळाले होते. तेव्हा भाजपच्या प्रवाहातही बाळापुर मतदारसंघात बळीराम यांचा विजय झाला होता. तेव्हा ते या मतदार संघातील सगल दुसऱ्यांदा आमदार झाले होते. त्यामुळे आता युती आणि आघाडी या मतदार संघात आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यात असला तरी शिवसेनेकडून या मतदार संघात दावा केला जात आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही हेच सुरु आहे. हा मतदार संघ काँग्रेसकडे असला तर राष्ट्रवादीने येथे दावा केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीने पुन्हा सिरस्कारांना पाठिंबा दिला तर त्यांना बळीराम मतदार संघात हॅट्रीक साधण्याची संधी आहे.

दरम्यान, बुलडाणा लोकसभा मतदार संघातून भरीप बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सिरस्कार यांना उमेदवारी पक्की समजली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –