MLA Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांना पुणे न्यायालयाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध झालेल्या कारवाई विरुद्ध शिवसेना आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी भाषणामध्ये भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे याच्यावर टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजप कार्यकर्त्याने सामाजिक भावना भडकावल्या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असल्याची माहिती अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.

 

आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणी वेळी अॅड. ठोंबरे यांनी आमदार भास्कर जाधव हे शिवसेना पक्षाचे एक विद्यमान आमदार आहेत. कुडाळ येथील भाषणात त्यांनी कुठल्याही प्रकारे समाजात फूट पडेल असं वक्तव्य केले नव्हतं. तसेच त्यांनी कुठल्याही समाजाबाबत किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे भादवी कलम 153 (अ) हे भास्कर जाधव यांच्या विरुद्ध लागू होत नाही. जाधव हे तपासात सहकार्य करतील. कोर्ट ज्या अटी व शर्ती घालून देईल त्याचे ते पालन करतील म्हणून त्यांचा अंतरिम जामीन कायम करण्यात यावा असा युक्तिवाद केला.

सरकार पक्ष तर्फे सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी जामीनास जोरदार विरोध करताना अर्जदारांनी भाषण केल्याचे कबूल केले आहे.
तसेच या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर यांनी जाणून-बुजून प्रसारित केली.
तसेच आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असल्याने त्यांचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस गुल्हाणे यांनी भास्कर जाधव यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

आमदार भास्कर जाधव यांच्या तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. दिग्विजयसिंह ठोंबरे व अॅड. विष्णू होगे यांनी सहाय्य केले.

 

Web Title :- MLA Bhaskar Jadhav | MLA Bhaskar Jadhav gets relief from Pune court; Granted anticipatory bail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत