×
Homeताज्या बातम्याSocial Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण...

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन – Social Media Influencer Rohit Bhati | रोहित भाटी या सोशल मीडिया सेलिब्रिटीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ग्रेटर नोएडा येथे सोमवारी अपघात झाला आहे. वेगाने जाणारी कार झाडावर आदळून अपघात झाला. राऊडी भाटी या नावाने देखील त्याला ओळखले जायचे. अपघातानंतर तातडीने रोहितला रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील गाडीत उपस्थित होते. हे दोन्ही मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत.

त्यातील एका मित्रावर ग्रेटर नोएडात, तर दुसऱ्यावर दिल्लीमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती स्विफ्ट भरधाव वेगात आली आणि झाडावर आदळून हा अपघात झाला. यामध्ये रोहित आणि त्याचे दोन मित्र उपस्थित होते. हे तिघेही एका पार्टीतून परतत असताना चुहाडपूर अंडरपास जवळ पहाटे तीन च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघात स्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यानच रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रोहित हा बुलंदशहरचा रहिवासी होता आणि तो ग्रेटर नोएडाच्या सी सेक्टर मध्ये राहत होता.
(Rohit Bhati) रोहित हा गुजर समुदायाचा होता. फेसबुक आणि instagram वर त्याचे अनेक फॉलोवर्स देखील आहेत.
रोहित हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर खूप लोकप्रिय होता. त्याच्या निधनानंतर त्याचे फॉलोअर्स त्याचे
जुने व्हिडिओ शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

Web Title :- Social Media Influencer Rohit Bhati | social media influencer rohit bhati died in car accident in greater noida

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News