आमदाराची मुलगी व तिच्या पतीला वकिलांची धक्काबुक्की

अलाहाबाद : वृत्तसंस्था – भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा पती अजितेश कुमार यांच्यावर सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला. साक्षी हिने अजितेश कुमार याच्याशी आंतरजातीय लग्न केले असून आम्ही आंतरजातीय लग्न केल्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे, असा आरोप केला होता. त्यानुसार या दोघांना संरक्षण दिल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्यावर हल्ला झाला.

सुनावणीनंतर साक्षी व अजितेश कुमार हे न्याय कक्षातून बाहेर येताच काही वकिलांनी त्यांना धक्काबुक्की केली, असे साक्षीदार म्हणाले. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांनी या जोडप्याला संरक्षण मंजूर केले. राजेश मिश्रा हे आमच्या लग्नावरून नाराज असल्यामुळे आमच्या जीविताला त्यांच्याकडून धोका आहे, असे या जोडप्याने म्हटले होते.

साक्षी ही ब्राह्मण तर अजितेश कुमार हा दलित आहे. आम्ही प्रौढ असून आम्ही आमच्या इच्छेने लग्न केलेले असल्यामुळे आमच्या शांततामय जगण्यात मिश्रा किंवा पोलिसांनी अडथळा आणायला नको, अशी विनंती साक्षी व अजितेश कुमारने केली होती.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like