MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण : शिंदेंच्या वकिलांनी प्रश्नांचा भडीमार करत सुनील प्रभूंना घेरलं, सुनावणीत नेमकं काय घडलं?

मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) आजच्या सुनावणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू (MLA Sunil Prabhu) यांची उलटतपासणी झाली. यामध्ये शिंदे गटाचे (Shinde Group) वकील महेश जेठमलानी (Advocate Mahesh Jethmalani) यांनी एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार करून सुनील प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही प्रश्नांवरून दोघांमध्ये खडाजंगी देखील उडाली. (MLA Disqualification Case)

विधान परिषद निवडणुकीनंतर बैठकीसाठी तुम्ही आमदारांना व्हिप स्वतःच्या अधिकारात काढला होता का? पक्षप्रमुखांनी तुम्हाला लिखित स्वरूपात सूचना केली होती का? जेव्हा तुम्ही व्हिप जारी केला तेव्हा तुमच्यासोबत कोणकोणते आमदार होते? असे एकापाठोपाठ एक प्रश्न महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभुंना विचारले.

या प्रश्नांना प्रत्येकवेळी एकच उत्तर देताना प्रभू यांनी म्हटले, ही सर्व माहिती रेकॉर्डवर आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी म्हटले की, तुम्ही प्रतिज्ञापत्र जरी दिले असले आणि हे सगळे रेकॉर्डवर असले तरीही या प्रतिज्ञापत्राची शहानिशा करण्यासाठी साक्ष उलट साक्ष नोंद करत आहोत. (MLA Disqualification Case)

अध्यक्षांनी अशाप्रकारे सांगितल्यावर सुनील प्रभू यांनी शिंदे गटाच्या वकिलांच्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.

व्हिपच्या तारखेच्या प्रश्नावर उत्तर देताना सुनील प्रभू यांनी म्हटले की, मी आधीच सांगितले आहे की, व्हिप जारी केला ती वेळ रात्री साडेअकरा ते बारा या दरम्यानची होती. त्यामुळे मी व्हिपवर दुसऱ्या दिवशीची म्हणजेच २१ जूनची तारीख टाकली आणि व्हिप बजावण्यास सुरुवात केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करा, शरद पवार गटाचे शिष्टमंडळ उपराष्ट्रपतींच्या भेटीला