NCP Sharad Pawar Group | प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करा, शरद पवार गटाचे शिष्टमंडळ उपराष्ट्रपतींच्या भेटीला

नवी दिल्ली : NCP Sharad Pawar Group | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे, असा दावा बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) केल्यानंतर यासंबंधीची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या सुनावणीत प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. तसेच शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या अडचणी भविष्यात वाढू शकतात.

प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. यासाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती जगदीप धनकड (Vice President Jagdeep Dhankad) यांची भेट घेतली. चार महिन्यांपूर्वी १०व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने शरद पवार गटाने ही भेट घेतली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule),
राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांचा सहभाग होता.
ही भेट घेण्यापूर्वी खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेचे सभापती यांना पत्राद्वारे स्मरणपत्र दिले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दिल्लीच्या तक्ख्तावर धडकणार आरक्षणाचे वादळ! जाट-मराठ्यांचा एकत्र एल्गार

कोर्टात पोहोचण्यास उशीर, दोन पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा

गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या आणून थेट समुद्रात टाकल्या, व्हिडिओ पाहिल्यावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई