भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची गाडी आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

आमदार कथोरे टिटवाळा येथून बदलापूर मार्गाने येत असताना वाहूली गावानजीक समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाला. यात दुचाकीवरील अमित नंदलाल सिंग (२२) आणि सिमरन दीपक सिंह (दोघेही राहणार नेतीवली) यांचा जागीच मृत्यू झाला.

कथोरे यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात कथोरे, गाडी चालक आणि सुरक्षारक्षक यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर बदलापूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आरोटे तपास करत आहेत.