MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Nitesh Rane | भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार टीका केली आहे. ‘सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ या संस्थांचा कणा मोडणारे ठाकरे सरकारने केलं आहे. मराठा तरुणांचे वय वाढत असताना मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारचा तोडगा या 2 वर्षात काढलेला नाही, यावर राज्य सरकारने उत्तर दिलंच पाहिजे,’ असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. त्यावेळी ते आज (बुधवारी) मुंबईत बोलत होते.

नितेश राणे (MLA Nitesh Rane) म्हणाले की, ‘ठाकरे सरकारला आर्यन खानची चिंता आहे. पण पाटलाच्या मुलाची, देशमुखाच्या मुलीची चिंता नाही.’ सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ या संस्थांचा कणा मोडणारे ठाकरे सरकार मराठा तरुणांचे वय वाढत असताना नोकरीची शास्वती देऊ शकत नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) 2 वर्षांत एक तरी बैठक घेतली असेल तर त्याचा फोटो दाखवावा. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा काळ परत आणावा लागेल, या सरकारला झुकवल नाही तर, हे गेंड्याच्या कातडीचे लोक असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

पुढे ते म्हणाले, दोन वर्ष राज्य सरकारने (Thackeray government) मराठा आरक्षणाच्याबाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
या काळात समाजाने 58 मोर्चे काढले आहेत, त्यावर कोणतेही भाष्य नेत्यांनी केलेलं नाही. तर, छत्रपती शिवाजी महारांजांच्या स्मारकाबद्दल मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? असा सवाल देखील नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

Web Title : MLA Nitesh Rane | BJP MLA nitesh rane criticized on cm uddhav thackeray aryan khan drugs case and maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR